यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ जुलै २५ सोमवार
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारत सरकारच्या ‘एक पेड मा के नाम’ व ‘अमृतवृक्ष’ अभियानाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आली.
दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण व्हावी,त्यांच्यावर पर्यावरण विषयी सकारात्मक संस्कार रुजावेत या हेतूने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या हाताने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून नेहमीप्रमाणे एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न महाविद्यालयाने केला.या प्रसंगी उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार, उपप्राचार्य डॉ जी.एच.भंगाळे,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.मनोज पाटील,प्रा.आर एस तडवी,प्रा.संदीप मोरे,प्रा.एन एस गवळे,प्रा.सोनाली पाटील,प्रा.सुनील पाटील, मिलिंद बोरखडे तसेच सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.