यावल गटविकास अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात यावी !! शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाची मागणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ ऑगस्ट २५ शुक्रवार
येथील पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या मनमानी व दडपशाहीच्या कारभाराबाबत सर्वसामान्य नागरीकांपासुन तर लोकप्रतिनिधींमध्ये मोठया प्रमाणावर नाराजी असुन त्यांच्या बेजबाबदार कामाला लगाम घालावी अशी मागणी शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस गटाच्या प्रमुख पदधिकाऱ्यांच्या शिष्टमंडाळाने सहाय्यक गटविकास अधिकारी बा का पवार यांच्याकडे व्यथा व्यक्त करून गटविकास अधिकारी यांच्या प्रशासकीय कामकाजाबाबतची माहिती वरिष्ठ पातळीवर द्यावी अशी मागणी केली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की,यावल पंचायत समितीच्या कार्यरत असलेल्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांच्या नागरीकांशी व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मिळत असलेल्या असभ्य वागणुकी संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार,यावल तालुका प्रमुख राजु काटोके,राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे युवकचे जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील व आकाश चोपडे यांच्यासह त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने यावल पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी बा का पवार यांची भेट घेवुन गटविकास अधिकारी यांच्या प्रशासकीय कामकाज व त्यांची सर्वसामान्य नागरीकांना एव्हडेच नाही तर पत्रकार यांना देखील मिळत असलेल्या अशोभनिय वागणुक व दडपशाही आणी मनमानी कारभाराबाबत अनेक तक्रारी आहे.परीणामी अशा प्रकारे प्रशासकीय सेवेत बेजबाबदारपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांची यावल पंचायत समितीतुन तात्काळ बदली करण्यात यावी तसे न झाल्यास शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असेही सदरील शिष्टमंडळाने सहाय्यक गटविकास अधिकारी बा का पवार यांच्याशी बोलतांना सांगीतले आहे.सदरहू सिइओ यांनी या संदर्भात गांर्भीयाने लक्ष घालुन गटविकास अधिकारी यांची बदली करावी अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी नितिन सोनार,जुगल पाटील,राजु काटोके,आकाश चोपडे,सागर सपकाळे,राजु सपकाळे, किरण महाजन,मनोहर पाटील व आदि पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान आपल्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा आपण प्रयत्न करू असे आश्वासन पवार यांनी शिष्ठ मंडळाशी बोलतांना दिले आहे.