Just another WordPress site

यावल येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने आयोजित वित्तीय साक्षरता अभियान आणि कर्ज वाटप मेळावा उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०१ ऑगस्ट २५ शुक्रवार

येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक यावल शाखा यांच्या वतीने तालुक्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना आर्थिक साक्षरता व भव्य कर्ज वाटप मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेच्या वतीने तालुक्यातील एकूण १० स्वयंसहायता समूहांना ३०.२५ लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात आले.सदरील मेळाव्यासाठी सचिन सूर्यभान काकडे शाखा व्यवस्थापक यावल,शरद शेंडे आणि अमोल झाडे MSRLM यावल यांची प्रमुख उपस्थीती होती.

सदरील मेळाव्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या बँक सखींचा सत्कार करण्यात आला तसेच बँकेचे कर्ज घेऊन वैयक्तिक व सामूहिक व्यवसाय करणाऱ्या उद्योजक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते यावल तालुक्यातील स्वयंसहाय्यता बचत गटांना कर्ज मंजुरी पत्र व प्रतिनिधीक स्वरूपातील चेकचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन काकडे यांनी बँकेच्या विविध योजना व त्यातून मिळणारा लाभ याविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.बँकेच्या कर्जातून महिलांनी स्थानिक पातळीवर विविध उद्योग व्यवसाय निर्माण करावे व ऑनलाईन स्तरावर माध्यमांचा वापर करून त्याची विक्री चांगल्या प्रकारे करावी असे आवाहन केले.तसेच त्यांनी गटांना कर्ज वितरण कोणत्याही अडकाठी शिवाय व जास्तीत जास्त रक्कम देण्याचे ही आश्वासन दिले.प्रसंगी उमेदचे तालुका समन्वयक अमोल झाडे आणि शरद शेंडे यांनी उमेद गटाविषयी सविस्तर माहिती दिली व कर्ज परतफेडीचे प्रमाण शंभर टक्के राहील याची ग्वाही दिली.यावल शाखेतील  अधिकारी जानवी खोडे,वैशाली नगराळे व रोखपाल चेतनसिंह राजपूत यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.शाखेचे शिपाई महेश खाचणे,भूषण महाजन व बँक सखी अश्विनी कोळी यांच्यासह बचतगटाच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.