Just another WordPress site

भालोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात टीबी मुक्त भारत अभियान कार्यक्रम उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०१ ऑगस्ट २५ शुक्रवार

तालुक्यातील भालोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काल दि.३१ जुलै गुरुवार रोजी टीबी मुक्त भारत अभियान-२०२५ अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम जिल्हा जळगाव यांच्या विद्यमाने “क्षयमुक्त गाव माझी जबाबदारी” अंतर्गत ‘टीबी मुक्त गाव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रदीप कोळी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजू तडवी,तालुका टीबी लॅब सुपरवायझर नरेंद्र तायडे,वैद्यकीय अधिकारी डॉ भावेश जावळे,ग्रामविकास अधिकारी पाटणकर,डॉ गायत्री साठे हे होते.प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजू तडवी,तालुका टीबी लॅब सुपरवायझर नरेंद्र तायडे,वैद्यकीय अधिकारी डॉ भावेश जावळे यांनी टीबी आजाराची लक्षणे,टीबी आजाराबाबत घ्यावयाची काळजी,टीबी मुक्त भारत अभियानाची रूपरेषा व माहिती,टीबी मुक्तीबाबत शासनाचे धोरण याबाबत उपस्थितांना विस्तृत असे मार्गदर्शन केले.प्रसंगी टीबी रेखाचित्र रांगोळी काढून टीबी आजाराबाबत मार्गर्शन करण्यात आले हे विशेष !.यावेळी सरपंच प्रदीप कोळी,आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजू तडवी,तालुका टीबी लॅब सुपरवायझर नरेंद्र तायडे,वैद्यकीय अधिकारी डॉ भावेश जावळे,ग्रामविकास अधिकारी पाटणकर,डॉ गायत्री साठे,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ हर्षल चौधरी,डॉ झाकीर पिंजारी,डॉ अर्चना पाचपोळे,डॉ पंकज पाटील यांच्यासह आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेवक,सेविका व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.