यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०२ ऑगस्ट २५ शनिवार
येथील शहरातील नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील विविध ठीकाणी स्वच्छता सोयी सुविधांचा अभाव दिसुन येत आहे तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोकाट गुरांच्या वावरामुळे दुचाकी वाहनधारकांचे अपघात होत असल्याने नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असुन नगरपरिषद प्रशासनाने या प्रश्नाकडे जातीने लक्ष देवुन शहरवासियांचा प्रश्न सोडवावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला नुकतेच देण्यात आले.
या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद प्रशासनाला लिखित निवेदनात म्हटले आहे की,यावल नगरपरिषदच्या माध्यमातुन शहरातील विविध क्षेत्रात स्वच्छतेच्या अभावी अनेक ठिकाणी सद्या पाऊसाळ्याचे दिवस असल्याने दुर्गंधीच्या घाण पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे डासांचा उपद्रव वाढल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.यावल नगर परिषद प्रशासनाने नागरीकांच्या आरोग्याची तात्काळ काळजी घेत स्वच्छता मोहीम राबवावी तसेच शहरातील विविध चौकात व सार्वजनिक ठीकाणी व शहराला जोडलेल्या राज्य महामार्गावरील रस्त्यावर मोकाट गुरांचा वावर वाढला असुनही मोकाट गुरे रस्त्याच्या मध्यभागी टोळ्क्याच्या रूपात बस असल्यामुळे दुचाकी वाहनधारकांना व ईतर वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असुन प्रसंगी वाहनधारकांचे अपघात देखील होत आहे.तरी नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार,शिवसेना शिंदे गट युवकचे तालुकाप्रमुख अजय तायडे,नाना महाजन,पंकज तायडे,राजु सपकाळे,चेतन सपकाळे,सागर कोळी यांच्या वतीने यावल नगरपरिषदला नुकतेच रुजु झालेले बांधकाम व नोडल अधिकारी संग्राम शेळके यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.