गोंडगाव माध्यमिक विद्यालयात भडगाव पोलीस स्टेशन मार्फत विद्यार्थी सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.०३ ऑगस्ट २५ रविवार
तालुक्यातील गोंडगाव माध्यमिक विद्यालयात भडगाव पोलीस स्टेशन मार्फत आयोजीत विदयार्थी सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम दि.१ रोजी सकाळी ११.३० वाजता संपन्न झाला.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जी.नन्नावरे हे होते.
यावेळी भडगाव पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकाळ यांनी मार्गदर्शन करतांना विदयार्थ्यांना सांगीतले कि,विद्यार्थ्यांनी शाळेचा परीसर स्वच्छ ठेवावा,सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करु नये,झाडे तोडु नये,शासकीय मालमत्तेचे नुकसान करु नये तसेच गुडटच व बॅडटच याबाबत विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्याचबरोबर मोबाईलचा योग्य वापर करावा,मोबाईलवरची लिंक ओपन करु नये,गेम खेळतांना करमणुक म्हणुन वापर करा,व्हिडीओ काॅल व अनोळखी फोन उचलु नये,शाळेत एकमेकांचे हेवेदावे करु नये,आनंदात राहावे,रागात काही घटना घडतील असे वागु नका, टवाळखोर मुले ञास देत असतील तर शिक्षकांना सांगा किंवा घरी आई वडीलांना सांगा तसेच आता पासुन विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा जेणेकरुन पुढे स्पर्धा परीक्षांसह इतर परीक्षांमध्ये
तुमचा फायदा होईल इतर क्षेञात नोकर्या मिळतील असे अनमोल मार्गदर्शन पोलीस उप निरीक्षक लक्ष्मी करंकाळ यांनी विद्यार्थ्यांना केले तसेच मुला मुलींशी संवाद साधला.कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जी.नन्नावरे यांनी मनोगतातुन विद्यार्थ्यांना शिस्तीचे पालन,नियमांचे पालन व चांगला अभ्यास करावा असे अनमोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुञसंचलन एस.डी. चौधरी यांनी केले तर आभार व्हि.ए.पाटील यांनी मानले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यालयामार्फत पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी कंरकाळ यांचा सत्कार विदयालयाचे मुख्याध्यापक बी.जी.नन्नावरे यांनी पुष्पगुच्छ देऊन केला तर पोलीस हेडकाॅन्सटेबल निलेश ब्राम्हणकार,होमगार्ड समाधान देशमुख आदि पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांचा सत्कार आर.एस.पाटील,ए.एम.परदेशी आदिंचे हस्ते करण्यात आले.