Just another WordPress site

निमगावजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यु तर दोन जखमी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०४ ऑगस्ट २५ सोमवार

यावल-भुसावळ मार्गावरील निमगावजवळ भुसावळकडून यावलला येणाऱ्या दुचाकी वाहनास भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत झालेल्या भिषण अपघातात एका तरूणाचा दुदैवी मृत्यु झाला असुन दोन तरुण जख्मी झाले आहे यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की,यावल-भुसावळ या मार्गावरील निमगाव गावाजवळ काल दि.३ ऑगस्ट रविवार रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास भुसावळ येथील पपईचे व्यापारी इरफान मुश्ताक बागवान,सईद शकील बागवान आणी दानिश फकीर मोहम्मद बागवान सर्व राहणार जाममोहल्ला बाबला हॉटेल जवळ भुसावळ हे तिघ तरूण पपईचे व्यापारी आपल्याकडील मोटरसायकलव्दारे यावलकडे येत असतांना निमगाव या गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात ईरफान मुश्ताक बागवान वय ४४ या तरुण व्यापाऱ्याचा दुदैवी मृत्यु झाला असुन दोन तरूण सईद शकील बागवान वय ४५ वर्ष व दानिश फकीर मोहम्मद बागवान वय २४ वर्ष हे तरुण जख्मी झाले आहेत. सदरील दोघ जख्मींना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील दानिश बागवान या तरूणाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.याबाबत यावल पोलीस ठाण्यात अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झाला नसून शुन्य क्रमांकाने पोलीसांना माहीती मिळाल्यावर त्या अज्ञात वाहनचालका विरूद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहीती पोलीस सुत्राकडून प्राप्त झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.