यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ ऑगस्ट २५ मंगळवार
तालुक्यातील किनगाव येथील स्व.केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशन व इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल किनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.८ ऑगस्ट २५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबीरात रक्तदान करणाऱ्या दात्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान स्व.केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशन व इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल किनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.८ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे होणाऱ्या या रक्तदान शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथील डॉ.राहुल पाटील, एल.टी.त्रिपाठी,दीपक होनमने,कपिल पाटील,प्रदीप पाडवी,अक्षय धोंडगे,प्रभाकर पाटील,अश्विनी यादव,सीमा गावंडे,मनोज पाटील,राजेश शिस्ती,सादाब खान व मोबीन पठाण इ.चे योगदान लाभणार आहे.तरी परिसरातील रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान करावे असे आवाहन स्व.केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष मनिष विजयकुमार पाटील यांनी केले आहे.