यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०६ ऑगस्ट २५ बुधवार
तालुक्यातील मारूळ येथील आयडियल हायस्कूल मध्ये बालविवाह निर्मूलन जागरूकता सत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सय्यद बशारत अली उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव सय्यद इमरान अली हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील मुख्याध्यापक अश्फाक शेख यांनी केले.
दरम्यान जिल्ह्यात सक्षम बालविवाह निर्मूलन प्रकल्प महिला व बालकल्याण विभाग,युनिसेफ व एस बी सी ३ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेले कार्यक्रम जिल्ह्यातील ७५ निवडक शाळामध्ये सुरू असलेले बालविवाह निर्मूलनासाठी विद्यार्थी सक्षमीकरण आणि पालक जागरूकता सत्र घेण्यात येत आहे.या कार्यक्रमात जिल्ह्यातील स्थानिक भागीदारी असलेली संस्था साने गुरुजी फाउंडेशन अमळनेर येथील प्रशिक्षित स्वयंसेविका आरती मोरे तसे त्यांचे सहकारी छाया कोळी यांनी विद्यार्थीना व्याख्यान व अॅक्टिविटी घेऊन बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह व लैंगिक छळ थांबण्याकरिता शासनाने दिलेले हेल्पलाइन नंबर यावर सखोल मार्गदर्शन केले.प्रसंगी शाळेतील शिक्षिका अफरोज सय्यद व संजीदा तडवी यांच्या हस्ते आरती मोरे व छाया कोळी यांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक अशफाक शेख यांनी समाजात आपले कर्तव्य व समाजिक जबाबदारी तसेच शिक्षणाचे महत्त्व यावर आपले मत व्यक्त केले तर शिक्षण विभागाने आयडियल उर्दू हायस्कूल मारूळ या शाळेला निवडलेल्या बद्दल शासनाचे आभार सय्यद इसाक जामीन अली यांच्यामार्फत करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख जमीर,अश्फाक अहमद,नूरुल हूदा सय्यद फुरकान,सय्यद रहमत अली सय्यद इरफान,सय्यद रिजवान मेयार अहमद यांनी परिश्रम घेतले.