यावल येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत चौकशी करून कार्यवाही व्हावी !! शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शिष्ठ मंडळाची सीईओ कडे मागणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०६ ऑगस्ट २५ बुधवार
येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांना ग्रामीण क्षेत्रातील नागरीकांच्या समस्यांचे व अडचणीचे निवारण व्हावे या उद्धीष्ठाने राज्य शासनाच्या वतीने तक्रार निवारण सभा घेणे बंधनकारक असतांना देखील शासकीय नियम धाब्यावर ठेवुन कारभार सुरू असुन अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात येवुन त्यांच्या संपुर्ण कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठ मंडळाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्याकडे नुकत्याच दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
या संदर्भात दिलेल्या तक्रारदारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची भेट घेवुन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र शासनाच्या ३ मार्च २०२० च्या परिपत्रकानुसार राज्यातील व जिल्ह्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांनी नियमानुसार प्रत्येक महीन्याच्या पहिल्या शुक्रवारी नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तक्रार निवारण सभा घेणे व या तक्रार निवारण सभेत प्राप्त झालेल्या नागरीकांच्या संपुर्ण तक्रारींची माहिती हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविणे नियमानुसार बंधनकारकअसतांना गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांनी आजपर्यंत पंचायत समितीच्या माध्यमातुन एकही तक्रार निवारण सभा घेतल्याचे दिसुन येत नाही.गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांनी आजपर्यंत एकही तक्रार निवारण सभा न घेण्या मागचे कारण काय ? त्यांना कुणाचा पाठींबा आहे का ? असा प्रश्न ग्रामीण नागरीकांमध्ये उपस्थित केला जात आहे.अशा प्रकारे कर्तव्यात कसुर करीत शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवुन कारभारात मनमानी करीत शासकीय नियमांची पायमल्ली करणाऱ्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांची वरिष्ठ पातळीवर खातेनिहाय चौकशी करण्यात येवुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व त्यांची यावलहुन तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार,राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक काँग्रेसचे जुगल पाटील,यावल तालुका अध्यक्ष राजु काटोके,आकाश चोपडे,शिवसेना फैजपुर शहर प्रमुख पिंटू मंदवाडे,चेतन संपकाळे आदीनी केली आहे.दरम्यान या संदर्भात येत्या दोन दिवसात हे शिष्ठ मंडळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती पदाधिकारी यांनी ‘पोलीस नायक’शी बोलतांना दिली आहे.