केन्द्र शासन पुरस्कृत टिशुकल्चर लॅब प्रकल्पाची उभारणी यावल येथे करण्यात यावी !! शेतकरी संघर्ष समितीची निवेदनाद्वारे मागणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०६ ऑगस्ट २५ बुधवार
केंद्र शासन पुरस्कृत नविन टिशुकल्चर लॅब यावल येथे करण्यात यावी अशी मागणी यावल महसुल मंडळ केळी उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने केन्द्रीय मंत्री ना.रक्षाताई खडसे,जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील,रावेर यावलचे आमदार अमोल जावळे यांच्याकडे नुकत्याच दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या संदर्भात केळी उत्पादक संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जळगाव जिल्ह्यातील यावल,रावेर,चोपडा व भुसावळ हे पंचक्रोशीतील केळी उत्पादनाचे प्रमुख क्षेत्र असुन या क्षेत्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळीचे अधिक उत्पादन वाढीसाठी कमी किमतीत रोगमुक्त दर्जेदार टिशु कल्चर रोप उपलब्ध व्हावी या उद्देशाने केन्द्र शासनाच्या माध्यमातुन विशेष टिशु कल्चर प्रकल्प उभारणीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.सदरहू केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने यावल हे रावेर भुसावळ चोपडा या क्षेत्रातील शेतकरी बांधवांसाठी मध्यवर्ती ठीकाण असुन केळीचे निर्यात क्षम उत्पादन करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे तसेच यावल येथील कृषी विभागाची सुमारे २५ हॅक्टर जागा ही मुबलक पाण्यासह उपलब्ध आहे.दरम्यान तालुक्यातील महसुल मंडळाचे केळी उत्पादक शेतकरी बांधवांच्या वतीने शासनास निवेदनाद्वारे विनंती करण्यात येत आहे की,यावल येथे नविन टिशु कल्चर लॅब उभारणी झाल्यास तालुक्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल व टिशुकल्चर मुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना रोगमुक्त दर्जदार केळी उत्पादन करण्याची संधी मिळेल.तरी यावल येथे केन्द्र शासनाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या टिशु कल्चर लॅब रोपे या प्रकल्पाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी यावल परिसरातील शेतकरी व यावल महसुल मंडळ केळी उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे.