महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत १४ ऑगस्ट २५ रोजी “पसायदान” म्हणण्यात येणार !! राज्य सरकारचा स्तुत्य निर्णय !!
प्रदीप सोनार,पोलीस नायक
मुंबई विभागीय प्रतिनिधी
दि.०७ ऑगस्ट २५ गुरुवार
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या वतीने यावर्षापासून एक स्तुत्य निर्णय घेण्यात आला असून सदर निर्णयाअंतर्गत येत्या दि.१४ ऑगस्ट २५ गुरुवार रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत “पसायदान” म्हणण्यात येणार आहे याबाबत मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशानुसार दि.२९ जुलै २५ रोजी ‘पसायदान’ प्रत्येक शाळांमध्ये म्हणण्याबाबतच्या संदर्भाधीन निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले असल्याचे तुषार महाजन उपसचिव,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रात नमूद करण्यात आलेले आहे.
दरम्यान सन २०२५ हे वर्ष संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंतीवर्ष आहे.तसेच येत्या दि.१५ ऑगस्ट २५ रोजी “गोकुळ अष्टमीस” संतश्रेष्ठ श्री.ज्ञानदेवांची ७५० वी जयंती असल्याने दि.१४ ऑगस्ट २५ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत “पसायदान” म्हणण्यात यावे असे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिलेले आहेत.परिणामी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशा नुसार दि.१४ ऑगस्ट २५ गुरुवार रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत “पसायदान” म्हणण्यात यावे अशा आपल्या स्तरावरुन आवश्यक त्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या असल्याबाबत तुषार महाजन,उपसचिव,महाराष्ट्र शासन यांनी परिपत्रकात म्हटले आहे.