यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ ऑगस्ट २५ गुरुवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील प्रिती विनोद राणे यांची भारतीय जनता पक्षाच्या यावल तालुका मंडळाच्या तालुका उपाध्यक्षपदी जळगाव जिल्हा पुर्व विभागाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत रामधन बाविस्कर यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या तालुका कार्यकारणीत ही निवड करण्यात आली आहे.
दरम्यान प्रिती राणे यांच्या निवडीचे आमदार अमोल जावळे,भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे,भारतीय जनता पक्षाच्या किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी,कृउबाचे माजी सभापती व संचालक हर्षल पाटील,यावल पंचायत समितीच्या माजी सभापती पल्लवी पुरूजीत चौधरी,संचालीका कांचन फालक, जिल्हा परिपदच्या माजी सदस्या सविता अतुल भालेराव,माजी तालुका अध्यक्ष व यावल तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक उमेश फेगडे,भाजपाच्या चिटणीस राखी योगराज बऱ्हाटे,तालुका हेमराज फेगडे,नितिन महाजन यांच्यासह आदींनी स्वागत केले आहे.