जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.०७ ऑगस्ट २५ गुरुवार
औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत येथील संजय पवार यांच्या समाजसेवा,संघटनात्मक कौशल्य आणि महामंडळाबद्दलच्या निष्ठेची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जळगाव जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरील नियुक्ती ही महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष कल्याणराव दळे व कार्याध्यक्ष दामोदर बिडवे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्तीपत्र संजय पवार यांना दि. ४ ऑगस्ट २५ रोजी देण्यात आले आहे.महामंडळाचे प्रदेश सरचिटणीस पांडुरंग गंगाधरराव भवर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या नियुक्तीपत्रात नमूद आहे की,संजय पवार यांनी संविधान व महामंडळाच्या नियमावलीनुसार जबाबदारी पार पाडावी जेणेकरून महामंडळाचा लौकिक अधिक वृद्धिंगत होईल.सदरहू नवनियुक्त जिल्हा सचिव संजय पवार यांचे समाजातील विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.