Just another WordPress site

“आपला दवाखाना” भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्याने १५ ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलन !! भीम आर्मी भारत एकता मिशनतर्फे संबंधितांना स्मरणपत्र !!

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०८ ऑगस्ट २५ शुक्रवार

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” या योजनेमध्ये झालेल्या आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहारांविषयी चौकशी व कार्यवाही करण्याबाबत निवेदन सादर केले होते व त्यानंतर आम्ही याच विषयावर जळगांव येथे पत्रकार परिषद घेऊन पुढीलप्रमाणे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील निवेदन दिले होते.तथापि काल दि.७ ऑगस्ट गुरुवारपर्यंत सदर प्रकरणी कोणतीही चौकशी किंवा कार्यवाही झालेली नाही त्यामुळे आम्ही या आधी दिलेल्या सूचनेनुसार १४ ऑगस्ट २५ पर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यास १५ ऑगस्ट २५ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल असे संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून स्मरण करून देण्यात आलेले आहे.

सदरील आंदोलन कार्यक्रम पुढीलप्रमाणे असून यात दि.१५ ऑगस्ट २५ शुक्रवार रोजी सकाळी ७ वा जिल्हा परिषद जळगाव यांच्या आवारात धरणे आंदोलनास सुरुवात,त्यानंतर लाँग मार्च,जिल्हा परिषद कार्यालय,स्टेशन रोड,छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम,जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव,जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन व त्यानंतर पुन्हा जिल्हा परिषद कार्यालयात बेमुदत धरणे आंदोलन सुरू राहील.सदर आंदोलनाची प्रमुख मागणी म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व DPM पंकज शिंपी यांच्यावर तत्काळ चौकशी करून कठोर कार्यवाही करावी हि असून उक्त आंदोलन संपूर्णत शांततेच्या मार्गाने राबविण्यात येणार आहे.तरीही या आंदोलना दरम्यान जर कोणतीही अराजकता,कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असे गणेश सपकाळे जिल्हाध्यक्ष भीम आर्मी भारत एकता मिशन जळगाव यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या सदरील पूर्वसूचना व स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.