डोंगर कठोरा येथे पाऊस पडण्याकरिता दिंडी काढून देवाकडे साकडे !! कावड यात्रेतून श्रीक्षेत्र डोंगरदा येथील पायविहिरीवरून पाणी आणून महादेव पिंडीचे केले जलभरण !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०८ ऑगस्ट २५ शुक्रवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे श्री पंचवटी विठ्ठल मंदिर यांच्या वतीने व श्री गढीवरील विठ्ठल मंदिर व समस्त गावकऱ्यांच्या सहकार्यातून तसेच दिंडी प्रमुख रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल दि.७ ऑगस्ट गुरुवार रोजी पाऊस पडण्याकरिता दिंडी काढून देवाकडे साकडे घालण्यात आले.प्रसंगी डोंगर कठोरा ते श्रीक्षेत्र डोंगरदा येथपर्यंत कावड यात्रा काढण्यात आली व श्रीक्षेत्र डोंगरदा येथील पायविहिरीवरून पाणी आणून डोंगर कठोरा येथील श्रीमहादेव मारोती मंदिरावरील महादेव पिंडीचे जलभरण करण्यात आले हे विशेष !.
दरम्यान परिसरात गेल्या २०-२५ दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे दिवसेंदिवस खरीप पिकांची परिस्थिती हि फारच नाजूक होत चालली असून पाण्याविना पिके कोमजू लागली आहेत परिणामी शेतकरी वर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.तसेच पीक नुकसानीच्या धोक्यामुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.यात अखिल शेतकरी बांधवांवर वरुण राज्याची कृपा व्हावी व परिसरात पाऊस पडावा याकरिता तालुक्यातील डोंगर कठोरा येथील समस्त गावकऱ्यांच्या वतीने काल दि.७ ऑगस्ट गुरुवार रोजी वरुण राज्याला प्रसन्न करण्यासाठी दिंडी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदरील दिंडी श्री महादेव मारोती मंदिर येथून दिंडी प्रमुख रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात येऊन संपूर्ण गावातून प्रदक्षिणा घालून काढण्यात आली.यात डोंगर कठोरा ते श्री क्षेत्र डोंगरदा यातील ५ किमी अंतर हे पायी दिंडीच्या माध्यमातून मार्गक्रमीत करण्यात आले.तसेच श्रीक्षेत्र डोंगरदा येथील पवित्र अशा पायविहिरीचे कावड द्वारे पाणी आणून श्री महादेव मारोती मंदिरातील श्री महादेव पिंडीचे जलभरण करण्यात आले.सदर दिंडी सोहळ्यात दिंडी प्रमुख रवींद्र पाटील,दत्तात्रय गुरव,शालिक झोपे,दगडू पाटील,प्रकाश पाटील,दिनकर पाटील,धिरज भोळे,मधुकर पाटील,धर्मा बाऊस्कर,ज्ञानदेव पाटील,हेमंत सरोदे, संजय सरोदे,चांगदेव पाटील,डालू फेगडे,अशोक राणे,रामदास खडके,नारायण फेगडे,रेवानंद पाटील,अशोक गाजरे,पुष्पक मुऱ्हेकर,जयश्री पाटील,कांचन सरोदे,योगिता सरोदे,छाया भोळे,वंदना रडे,आरती पाटील,रेखा जावळे,छाया जंगले,उर्मिला पाटील,लतिका पाटील,लता भिरूड,कविता जंगले,कुसुम जंगले,रुपाली जावळे,लेखा भिरूड,मंगला खडसे यांच्यासह महिला-पुरुष भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थित होते.