आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ ऑगस्ट २५ शनिवार
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल येथील प्रभारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी व किनगाव येथील रहिवाशी संदीप चुडामन पाटील यांनी प्रकल्प कार्यालयात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आदर्श गृहपाल व सहाय्यक प्रकल्प अधिकारी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके,केंद्रीय क्रीडा मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे,राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे,अप्पर आयुक्त पावरा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद इ.सह शासकीय व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.संदीप पाटील यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल झालेल्या गौरवाने किनगावसह परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत कौतुक केले आहे.