यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ ऑगस्ट २५ शनिवार
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल एन.एन.एस.विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाअंतर्गत अवयवदान या विषयावर शपथ घेण्यात आली.
यावेळी ग्रामीण रुग्णालय यावल येथील समुपदेशक वसंतकुमार संदानशिव यांनी विद्यार्थ्यांना अवयवदानाविषयी माहिती दिली.यावेळी अवयवदानांमध्ये समाजाचा सहभाग वाढवणे गरज आहे.सध्या विविध अवयवांच्या प्रतीक्षा यादीत हजारो रुग्ण आहेत व त्यांच्यासाठी प्रत्येक अवयवदान मूल्य व अमूल्य आहे.त्याकरिता या जगात आपणाला मृत्यूनंतर ही जिवंत राहायचे असेल तर प्रत्येकाने अवयव दान करायला पाहिजे असे आव्हान केले व शपथ घेतली.यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी विद्यार्थ्यांना अवयवदान करणे ही प्रत्येकाशी जबाबदारी आहे.मृत्यूनंतर ते नष्ट करण्यापेक्षा रुग्णालयांना दान करून उपयोगात आणले तर ते पुण्याचे काम होईल.एखाद्या रुग्णाच्या शरीरात आपण मृत्यूनंतरही जिवंत राहू शकतो.त्या रुग्णाला डोळे,यकृत,किडनी हृदय यांसारख्या अवयवाशा माध्यमातून जीवदान मिळू शकते म्हणूनच अवयवदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असून त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पुढे यायला पाहिजे असे सांगितले.यावेळी एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.पी.व्ही.पावरा,डॉ.एच.जी.भंगाळे,कांचन चौधरी (ग्रामीण रुग्णालय यावल),एन.एस.एस.सहाय्यक सी.टी.वसावे व महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.आर.एस.शिरसाठ उपस्थित होते.