जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.०९ ऑगष्ट २५ शनिवार
भडगाव पोलीस स्टेशन येथे ५ लाख रुपये किमतीच्या ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा ६ तासांच्या आत उघडकीस
• गुन्हा नोंद: १७/०७/२०२५ ते ०५/०८/२०२५ दरम्यान ५ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर शासकीय आयटीआय येथून चोरी झाल्याची तक्रार सुधीर किटकुल सोनवणे यांनी भडगाव पोलीस स्टेशनमध्ये दिली होती.
• तपास आणि आरोपी: गोपनीय माहितीच्या आधारे सुनील कैलास पाटील, रा. गिरड, ता. भडगाव याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
• जप्ती: चोरी केलेला ५ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, जळगाव, मा. अपर पोलीस अधीक्षक सौ. कविता नेरकर, चाळीसगाव परिक्षेत्र, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड,चाळीसगाव भाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.महेश शर्मा, पोउपनिरी.सुशील सोनवणे, पोना/३२० मनोहर पाटील, पोकाँ/१९३२ प्रवीण परदेशी, चालक पोकाँ संजय पाटील यांनी केली आहे.पुढील तपास: पुढील तपास पोना/२८०० भूषण पाटील हे करत आहेत.