Just another WordPress site

लोणी येथील ग्रामपंचायतीचे जागतिक आदिवासी दिनाकडे दुर्लक्ष !!

महेश बोरसे,पोलीस नायक

चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-

दि.११ ऑगस्ट २५ सोमवार

संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन यंदा लोणी ग्रामपंचायतीत पूर्णपणे दुर्लक्षित राहिला असून ग्रामसेवक कुंदन कुमावत यांनी या दिवसाच्या आयोजनासंदर्भात कोणतेही शासन परिपत्रक किंवा सूचना ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या नाहीत असे सांगितले आहे.परिणामी लोणी ता.चोपडा येथील ग्रामपंचायत मध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आलेला नसल्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विशेष म्हणजे सदरील ग्रामसेवक कुंदन कुमावत हे गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीत अनुपस्थित असल्याने नागरिकांना विविध कामांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तसेच येथे आदिवासी दिवस साजरा करण्यात आलेला नसल्यामुळे आदिवासी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.परिणामी शासन परिपत्रक नसतानाही सामान्य जनतेच्या भावना लक्षात घेऊन हा दिवस साजरा व्हायला हवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान चोपडा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून या भागात बिरसा मुंडा जयंती आणि जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व अधोरेखित केले जाते मात्र यावर्षीचे दुर्लक्ष म्हणजे मोठे “दुर्दैवी व शोकांतिका” असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर चोपडा विधानसभा आमदार चंद्रकांत सोनवणे,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल,पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशन तालुका अध्यक्ष मुबारक तडवी व गावकऱ्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.