यावल येथील इंग्लिश मेडीयम स्कुलमध्ये सहकारमहर्षी जे टी महाजन यांना १०१ व्या जयंती निमित्ताने श्रध्दांजली !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ ऑगस्ट २५ गुरुवार
येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमध्ये राज्याचे माजी गृहराज्यमंत्री दादासो.जे.टी.महाजन व व्यास शिक्षण मंडळ यावलचे संस्थापक अध्यक्ष यांची १०१ वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शाळेच्या परिसरात संपन्न झालेल्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून इंग्लिश माध्यमच्या प्राचार्य दिपाली धांडे,शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री लोखंडे व पर्यवेक्षिका गौरी भिरूड उपस्थित होते.यावेळी स्व.जे.टी.महाजन दादासो यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमेला विनम्र अभिवादन केले.या जयंतीनिमित्त शाळेत हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अर्चना पाटील यांनी केले.तसेच शिक्षिका सरोज येवले यांनी सहकार महर्षी दादासाहेबांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.तसेच शिक्षिका यज्ञिका जावळे यांनी देखील दादासाहेबांच्या जीवनपट विद्यार्थ्यांना सांगितला.कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन शिक्षिका श्रद्धा बडगुजर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वितेकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.