यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ ऑगस्ट २५ गुरुवार
तालुक्यातील पाडळसे येथील लोक विद्यालयात यावल तालुकास्तरीय १४,१७ व १९ वर्षे वयोगटाच्या (मुलींच्या) खो-खोच्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आर.व्ही.पाटील व संचालक विनायक मधुकरराव पाटील यांनी केले.यावेळी ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय मधुकर पाटील,सचिव प्रवीण प्रभाकर चौधरी,संचालक ललितकुमार रमेश पाटील,शरद तुकाराम बऱ्हाटे,युवराज मधुकर पाटील,तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष शेखर तायडे, मुख्याध्यापक व्ही.बी.पवार,पर्यवेक्षक आर.टी.चौधरी,तालुका क्रीडा अध्यक्ष के.यु.पाटील,तालुका क्रीडा समन्वयक दिलीप बिहारी संगेले तसेच तालुक्यातील विविध शाळांमधून आलेले क्रीडा शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर पाटील यांनी केले.
दरम्यान तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक व विद्यार्थ्यांना खेळाची शपथ शाळेच्या क्रीडा शिक्षिका आर.एम.पाटील यांनी दिली.या स्पर्धेत लोक विद्यालय पाडळसे,जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल फैजपूर,जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल यावल,पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अकलूद,न्यू इंग्लिश स्कूल भालोद,घ.का.विद्यालय आमोदा,अ.ध.चौधरी विद्यालय कठोरा,ताप्ती माध्यमिक विद्यालय दुसखेडा,प्रभात विद्यालय हिंगोणा,शारदा विद्या मंदिर साकळी इ.शाळांनी सहभाग घेतला.वरील सर्व वयोगटांमध्ये लोक विद्यालय पाडळसे शाळेतील मुलींचे संघ विजयी ठरले या सर्धेत पंच म्हणून किशोर नेहते,व्ही.जी.बऱ्हाटे,वाय.बी.नेहते,एम.बी.पाटील,मिलिंद पाटील,सतीष कोळी यांनी परिश्रम घेतले.तर गुणलेखक म्हणून एस.आर.भोई,एल.डी बऱ्हाटे,एस.एल.पाटील,जे.एन.जंगले,एल.बी.कोळी,आर.बी.कोरपावलीकर,श्रीमती बी.एस.पाटील,श्रीमती पी.एम.महाजन,सौ.एम.एस.कोठेकर,सौ.व्ही.व्ही.चौधरी यांनी कामकाज पाहिले.स्पर्धेतील विजेत्या संघांना जिल्हास्तरावर यश मिळवण्यासाठी शाळेच्या संचालक मंडळाने शुभेच्छा दिल्या.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.