अवयव दान हे श्रेष्ट दान असुन अवयव दानातुन ती पुन्हा जिवंत राहू शकते !! जागतिक अवयवदान दिनानिमित्त गुरूजनांनी व्यक्त केल्या भावना !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ ऑगस्ट २५ गुरुवार
जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला,वाणिज्य व वाणिज्य महाविद्यालय यावल येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि.१२ व १३ ऑगस्ट रोजी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यात वक्त्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा आणि व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एच.जी. भंगाळे,उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार,प्रा.एस.आर.गायकवाड हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
दरम्यान विद्यार्थ्यांनी नेत्रदान श्रेष्ठदान,अपंग माणसाची व्यथा,आपले अवयव लाख मोलाचे या विषयावर भरभरून निबंध लिहिले.तसेच वक्तृत्व स्पर्धेसाठी अवयव दान श्रेष्ठदान,मानवी अवयवांची किंमत,अवयव दानातून पुन्हा जिवंत राहू या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले मते व विचार व्यक्त केले तसेच रांगोळी काढून विद्यार्थिनींनी अवयव दानाचे महत्त्व विशद केले.व्याख्यानाच्या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एच.जी.भंगाळे हे उपस्थित होते.यावेळी प्रमुख वक्ते प्रा.एम.डी.खैरनार आपल्या व्याख्यानातून अवयव दानाचे महत्त्व विशद केले.अवयव दान श्रेष्ठदान आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.एच.भंगाळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सांगितले की,अवयव दानातून माणूस पुन्हा जिवंत राहतो तसेच प्रत्येकाने अवयव दानाचा संकल्प केला पाहिजे तसेच रक्तदान सुध्दा केले पाहिजे हे त्यांनी आवर्जून सांगितले.या सदर कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.पी.व्ही.पावरा, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.आर.एस.शिरसाठ व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.सी.टी.वसावे यांनी घेतले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.