यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ ऑगस्ट २५ शुक्रवार
येथील व्यास शिक्षण मंडळाव्दारे संचलित जे.टी महाजन इंग्लिश स्कूल येथे आज दि. १५ ऑगस्ट शुक्रवार रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास व्यास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद जिवराम महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमाला जे.टी.महाजनचे प्रिन्सिपल श्रीमती रंजना महाजन,इंग्लिश मीडियमच्या प्रिन्सिपल दिपाली धांडे,आयटीआयचे प्रिन्सिपल गिरीश वाघुळदे,प्रवीण झोपे,पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे व गौरी भिरूड यांनी उपस्थिती दिली.
दरम्यान स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने देशभक्ती गीतांवर सोलो डान्स ग्रुप डान्स व स्पीच असे अनेक कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाबद्दल घेण्यात आले तसेच मुलांनी देशभक्तीपर गीते गायली.शिक्षिका रुचिता पाटील व खान यांनी मुलांना स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद जिवराम महाजन यांनी मुलांना अनमोल असे मार्गदर्शन केले.तर इंग्लिश मीडियमच्या प्रिन्सिपल दिपाली दांडे यांनी मुलांना स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती दिली तसेच मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका मनिषा पाटील व रेश्मा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सरोज येवले यांनी केले. मान्यवरांच्या उपस्थित सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला.