Just another WordPress site

उत्राण येथील २०० विद्यार्थ्यांना डेव्हलपमेंट असोसिएशनतर्फे मोफत अपघाती विमा कवचाचे संरक्षण !!

एरंडोल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१५ ऑगस्ट २५ शुक्रवार

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा उत्राण गु.ह.येथील २०० विद्यार्थ्यांना महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनच्या राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे अपघाती विमा कवच मोफत प्रदान करण्यात आले आहे.ही उपक्रमशैली जि.प.चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांच्या सौजन्याने शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या पुढाकारातून साकारण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष अमोल महाजन आणि संचालक विलास महाजन यांनी विशेष प्रयत्न करून विद्यार्थ्यांना संरक्षण कवच मिळवून दिले.

दरम्यान स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज दि.१५ ऑगस्ट २५ शुक्रवार रोजी गावातील मान्यवरांच्या हस्ते विमा प्रमाणपत्रांचे औपचारिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच वाल्मीक ठाकरे होते.यावेळी माजी सरपंच राजेंद्र पाटील,माजी उपसरपंच योगेश महाजन,ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र महाले, हरीश पांडे,दिनेश सोनवणे यांच्यासह सर्व सदस्य,पीक संरक्षण संस्थेचे चेअरमन रघुनाथ कुंभार,पत्रकार प्रकाश कुवर,पोलीस पाटील राहुल महाजन,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास कोळी व सर्व संचालक,मुख्याध्यापक सैंदाणे सर,सर्व शिक्षकवृंद,माजी अध्यक्ष राजेंद्र मिस्त्री,सामाजिक कार्यकर्ते मनोहर खेडकर,वैभव महाजन,जय मोरे,अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविका,ग्रामपंचायत कर्मचारी,पालक आणि ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अपघाती सुरक्षिततेसाठी एक भक्कम आधार मिळाला असून गावकऱ्यांनी या सामाजिक कार्याचे मनःपूर्वक स्वागत केले आहे. “विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केवळ शिक्षण नव्हे तर सुरक्षा देखील महत्त्वाची आहे,” असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.