संदीप धनगर,पोलीस नायक
निंबोल तालुका रावेर (प्रतिनिधी) :-
दि.१५ ऑगस्ट २५ शुक्रवार
येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत आज दि १५.ऑगस्ट शुक्रवार रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली व त्यानंतर जिल्हा परिषद मराठी शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम शांततेत पार पडला.यावेळी जि प शालेय समिती उपाध्यक्ष संदीप धनगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्ती पर गीत कार्यक्रमाचे करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक जिजाबराव पाटील यांनी केले.
दरम्यान इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांनी चांगल्या प्रकारे देशभक्तीपर गीते सादर केले.यात अनुष्का योगेश धनगर अथर्व संदीप धनगर व प्राची मनोज कोळी या मुलांनी देशभक्तीपर गीत गाऊन आपला चांगल्या प्रकारे ठसा उमटवला.यावेळी मुख्याध्यापक रमेश वानखेडे,उपशिक्षक अशोक कोळी,शिक्षक जिजाबराव पाटील, शिक्षिका वैशाली सोनवणे,मराबाई पाटील,कल्पना पाटील,मुख्यमंत्री युवा प्रशिक्षक सुलोचना पाटील,तलाठी स्वप्निल केवाडे,ग्रामसेवक मनोहर ठाकरे,सरपंच वंदना पाटील,ग्रामपंचायत सदस्य राहुल पाटील,युवा सेना उपतालुकाप्रमुख धीरज धनगर,प्रतिनिधी विनोद कोळी,मुनाफ टेलर,अमोल सोनार,मुकेश आमोदकर,युवराज तायडे,राहुल सोनवणे यांच्यासह अंगणवाडी सेविका तसेच गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.