यावल महाविद्यालयात रसायन विभागातर्फे पोस्टर स्पर्धा संपन्न !! हर्षल महाजन प्रथम तर भाग्यश्री चौधरी द्वितीय !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ ऑगस्ट २५ शनिवार
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या मार्फत “रसायनशास्त्र तील नाविन्यता” या विषयावर पोस्टर्स स्पर्धा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सहभागाने उत्साहाच्या वातावणात संपन्न झाली.
दरम्यान विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र विषयात गोडी आवड निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात याचाच एक भाग म्हणून पोस्टर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली.विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार,आय.क्यू.ए.सी.समन्वयक डॉ.एच.जी.भंगाळे,रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.डी.पवार,डॉ.एस.आर.गायकवाड यांनी विविध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.यात प्रथम हर्षल युवराज महाजन (तृतीय वर्ष विज्ञान),
द्वितीय भाग्यश्री शिरीष चौधरी (तृतीय वर्ष विज्ञान) व तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.यात ज्ञानेश्वरी महेंद्र देवरे (तृतीय वर्ष विज्ञान) व हितेश्री महेंद्र महाजन (द्वितीय वर्ष विज्ञान) यांनी यश संपादन केले.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.आर व्ही.निंबाळकर,प्रा.रत्नाकर कोळी यांनी काम पाहिले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा.रूपाली शिरसाट,प्रा.पी.व्ही.रावते,प्रा.हेमंत पाटील,ए.व्ही. सपकाळे,मिलिंद बोरघडे,प्रमोद कदम,अनिल पाटील,संतोष ठाकूर आदींनी सहकार्य केले.