हिंगोणा येथील केळी टिशु कल्चरच्या नियोजित जागेची केन्द्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्याकडून पाहणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ ऑगस्ट २५ सोमवार
रावेर यावल विधानसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या यावल तालुक्यातील हिंगोणा येथे होणाऱ्या टिशु क्लचर स्थापनेची नियोजित जागेची पाहणी देशाच्या केन्द्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी नुकतीच पाहणी केली याप्रसंगी त्यांच्यासोबत आमदार अमोल जावळे यांच्यासह आदी पदधिकारी उपस्थित होते.
रावेर,यावल,चोपडा,भुसावळ या परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिश्य महत्वाचे ठरणारे व केन्द्रीय सहकारीता मंत्रायलयाअंतर्गत कार्यरत भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड ही अत्याधुनिक सुविधा उभारणी जाणार आहे.हिंगोणा तालुका हिंगोणा येथे केळी टिशु कल्चर उभारले जाणार असुन या प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्यातील आणी इतर भागातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना रोगमुक्त,उच्च दर्जाची व अधिक उत्पादन देणारी रोपे वेळेवर आणी योग्य दरात उपलब्ध होणार आहे.या केळी टिशु कल्चर उभारणीच्या नियोजीत हिंगोणा येथील जागेची पाहणी केन्द्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी पाहणी केली.यावेळी त्यांच्या सोबत रावेर यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे,भाजपाचे जेष्ठनेते हिरालाल चौधरी,जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सविता भालेराव,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका कांचन फालक,भाजपा यावल मंडळाचे अध्यक्ष सागर कोळी,कृउबाचे माजी सभापती व संचालक हर्षल पाटील,संचालक उज्जैनसिंग राजपुत,पंचायत समितीचे माजी उपसभापती दिपक पाटील,भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ कुंदन फेगडे,यावल नगर परिषदचे माजी नगरसेवक उमेश फेगडे,माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास पाटील,भाजपाचे सरचिटणीस विलास चौधरी यांच्यासह स्थानिक पदधिकारी मोठया संख्येत उपस्थित होते.