ऊर्दु एज्युकेशन शिक्षण संस्था अँग्लो उर्दू हायस्कुल भडगाव वादाच्या भोवऱ्यात !! तालुक्यात कायम चर्चित असणारी संस्था जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१९ ऑगस्ट २५ मंगळवार
तालुक्यात कायम चर्चित असणारी संस्था पूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली असून अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये दोन जागा रिक्त असल्या कारणाने शिक्षक भरतीसाठी दै.वर्तमान पत्रामध्ये जाहिरात देऊन बोलावलेली बैठक आज अनपेक्षितपणे ‘पाठशाळा’ न होता ‘वादशाळा’ ठरली.अर्जांच्या फाईल्स कोपऱ्यात पडून राहिल्या पण तोंडी फटाके मात्र भडाभडा उडत राहिले.संस्थेतील मान्यवरांनी एकमेकांवर असा आरोपांचा पाऊस पाडला की पाहुण्यांना वाटावे इथे ‘वादविवाद स्पर्धा’ आहे आणि विषय आहे.”तू वाईट की मी चांगला ?”,टेबल आपटणे,बोट दाखवणे आणि मधूनच नजरेच्या वारांनी प्रतिस्पर्ध्याला छाटून टाकणे हा सभागृहात थेटरचा माहोल निर्माण झाला.संस्था न्यायालयाच्या भोवऱ्यात अटकण्याची शक्यता असु शकते अशी उपस्थिस्थामध्ये चर्चा असून उपस्थित उमेदवारांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून “इथे शिक्षक पदासाठी मुलाखत आहे का की ‘वादक- लाकार’ भरती चालू आहे ?” शेवटी भरती झाली की नाही माहित नाही पण वादाचे धडे मात्र सगळ्यांना मोफत मिळाले.
जिल्ह्यातील भडगाव येथील अँग्लो ऊर्दू हायस्कूलमध्ये रिक्त पदांसाठी विषय शिक्षकांच्या थेट मुलाखतीप्रसंगी माजी संचालक मंडळाने गोंधळ घातल्याप्रकरणी तीन वेगवेगळ्या तक्रारींवरून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाले आहेत.भरतीप्रक्रिया सुरू असतांना माजी संचालक मंडळाने जमाव जमवून दबाव आणण्याचा प्रयत्न केला असता उपस्थितांनी मागील शिक्षक भरतीत झालेल्या एक कोटीच्या अपहराचा मुद्दा उपस्थित करताच राडा झाला.भडगाव तालुका उर्दू एज्युकेशन सोसायटी भडगाव संचलित अँग्लो ऊर्दू हायस्कूलमध्ये रविवारी (ता.१०) हिन्दी व मराठी विषयांसाठी शिक्षकांच्या थेट मुलाखती बोलविण्यात आल्या होत्या.विद्यमान संचालक मंडळाच्या शालेय समन्वय समितीतर्फे विषय तज्ज्ञांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या मुलाखती सुरू असतांनाच माजी संचालक मंडळाने धडक देत शिक्षक भरती बेकादेशीर असल्याचा आरोप नासीर बागवान यांनी केला होता.मात्र त्यावर विद्यमान संचालक मंडळाने पत्रकार परिषद घेऊन तत्काळ सर्व अधिकृत दस्तऐवजांसह भरतीप्रक्रिया पूर्णतः पारदर्शक व नियमानुसार कायदेशीर करण्यात आल्याचा दावा केला आहे.शेवटी भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.याचवेळी माजी संचालक मंडळाच्या कार्यकाळातील एक कोटीच्या अपहाराचा मुद्दा उपस्थित झाल्याने एकच गोंधळ उडाला.घटनेची माहिती मिळताच अँग्लो उर्दूच्या संस्थेंतर्गत वादाला कलाटणी मिळाली आहे.
धर्मदाय उपायुक्तांनी फेटाळला माजी चेअरमन गटाचा फेरफार अर्ज !!
भडगाव येथील राज्यासह जिल्ह्यात शिक्षक भरती घोटाळाप्रकरण ताजे असतांना येथील अँग्लो उर्दू हायस्कूल शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात संस्थांतर्गत वाद आहेत.सचीव अमानुल्ला खान यांना पदावरून हटविण्यात यावे असा फेरफार अर्जाच्या सुनावणीअंती जळगाव धर्मदाय आयुक्तांंनी फेटाळला असून अँग्लो उर्दू हायस्कूलच्या संस्थांतर्गत वादात निर्णायक कलाटणी मिळाली आहे.
भडगाव येथील अँग्लो उर्दू हायस्कूलचे माजी.चेअरमन कादिर खान जोरावर खान यांच्यातर्फे अर्जदार म्हणून मुखातर शाह यांनी सचिव आमनुल्ला खान यांना पदावरून कमी करण्यासाठी अर्ज दाखल केलेला फेरफार अर्ज (क्र. 1092/19) जळगाव येथील जळगाव धर्मदाय उप आयुक्त यांनी सुनावणी घेतली व यात धर्मदाय उप आयुक्तांनी चौकशीअंती माजी चेअरमन कदीर खान यांच्याकडील अर्ज फेटाळला.या आदेशामुळे सचिव आमनुल्ला खान व विद्यमान संचालक मंडळने चेअरमन आसिम बेग हकीम बेग मिर्झा व व्हाईस चेअरमन जाकीर शेख अलाउद्दीन यांच्यासह संचालक मंडळाला मोठा दिलासा मिळाला आहे यातून विरोधी कदिर खान गटाला जोरदार धक्का बसला आहे.तसेच माजी चेअरमन कादिर खान यांचा दुसरा फेरफार अर्ज देखील नामंजूर झाला आहे.दरम्यान कादिर खान यांच्या वतीने अर्जदार म्हणून मुन्सफ खान इसा खान यांनी दाखल केलेला फेरफार अर्ज क्र. 1533/2019 संदर्भात धर्मदाय उप आयुक्त जळगाव यांनी १७ ऑक्टोबर २०२४ रोजी आदेश देत सन २०१४ ते २०१९ या करिता असलेले नावे परिशिष्ट वरून कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.यांनतर माजी चेअरमन कदिर खान यांच्या संचालक मंडळाकडून या आदेश आव्हान देण्यासाठी नाशिक धर्मदाय आयुक्तांकडे धाव घेतली आहे.
मात्र नवीन कार्यकारी मंडळाची पुढील हालचाल उत्सुकतेत !!
या संपूर्ण नाट्यमय घडामोडीनंतर ॲग्लो उर्दू हायस्कूल संस्थेची सर्वसाधारण जबाबदारी विद्यमान चेअरमन आसिम बेग हकीम बेग मिर्झा,व्हाईस चेअरमन जाकीर शेख यांच्यावर आहे.संचालक मंडळाच्या घडामोडी,नवीन धोरणात्मक निर्णय तसेच शालेय व्यवस्थापन पातळीवर होणाऱ्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मा चेअरमन कदीर खान व त्याचे संचालक मंडळ यांनी
शाळा दुरुस्तीच्या नावावर शिक्षक भरतीअंतर्गत संबंधीतांकडून घेण्यात आलेले एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा खळबळजनक आरोप गावातील स्पष्ट नागरिकांनी उपस्थित केला.माजी संचालक यांना राग आल्याने यावरून गोंधळ निर्माण झाला असून अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक नाजीम बेग हकीम बेग मिर्झा यांनी भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यात मा संचालक मंडळ पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक कार्यालयातील मुख्याध्यापकातील खुर्चीवर बसून महत्चाचे कागदपत्र फाडण्यात आले असल्याचेही फिर्यादीत मुख्याध्यापकांनी नमूद केले आहे. त्यानुसार भडगाव पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे व यात मुनसफ खान इसा खान (उर्फ बब्बू शेठ) रा भडगाव,नसीर बागवान रा पाचोरा आणि रोशन खान मोहम्मद खान रा भडगाव तसेच मुक्तार शाह रा पाचोरा अशा चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास दिलीप पाटील करीत आहेत.