यावल-भुसावळ मार्गावरील टी पाँईट ते जुना नाका रस्त्याची दयानिय अवस्था अपघातास आमत्रंण देणारी !! शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांची दुरुस्तीची मागणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ ऑगस्ट २५ मंगळवार
येथील शहरातुन जाणारे यावल-भुसावळ राज्य मार्गावरील टी पाँईट ते भुसावळ जुना नाका पर्यंतची रस्त्याच्या मध्यभागी पडलेली मोठमोठी खड्डे हे अपघातास आमंत्रण देणारी असुन बांधकाम विभागाच्या वतीने तात्काळ या खुड्डयांची गुणवत्तापुर्ण दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे पुर्व विभाग जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी केली असुन या संदर्भात ते लवकरच केन्द्रीय क्रिडा मंत्री ना.रक्षाताई खडसे व रावेर विधान सभा मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांची भेट घेवुन या मार्गाचे कॉंक्रीटीकरण व्हावे याबाबत विनंती पत्र देणार आहे.
दरम्यान यावल शहरातुन जाणाऱ्या राज्य मार्गावरील यावल ते भुसावळ या रस्त्यावरील भुसावळ टी पाँईट ते भुसावळ जुना नाका पर्यंतच्या मार्गाची वारंवार मोठमोठी खड्डे पडून वाताहात झाली असून या खड्डयांमुळे वाहनधारकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.यावल सार्वजनिक बांधकाम विभागा च्या माध्यमातुन तात्पुरती निकृष्ट प्रतिची दागडूगी करण्यात येत असते व काही दिवसांनी पूनश्च रस्त्याची अवस्था जैसे थे होते.या मार्गावर अनेक अपघात होवुन काहींनी आपला जिव गमावला असुन काहींना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले आहे.याबाबत आपण केन्द्रीय मंत्री ना रक्षाताई खडसे यांची व रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांची भेट घेवुन या सुमारे १ किलोमिटर रस्त्याचे चांगल्या प्रतिचे काँक्रीटीकरण करण्यात यावे यासाठी आपण आग्रहाची विनंती करणार असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा पुर्व विभागाचे उपसंघटक नितिन सोनार यांनी सांगितले आहे.