आर्टिफिशल व आर्टिफिशीयल इंटेलिजन्स वर विद्यार्थांना भविष्यात खुप काही करण्याची संधी !! आमदार अमोल जावळे यांचे प्रतिपादन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ ऑगस्ट २५ मंगळवार
येथील क्षत्रिय बडगुजर बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आयोजित सुमाई मंगल कार्यालय येथे विद्यार्थींचा गुणगौरव सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थित नुकताच संपन्न झाला.प्रसंगी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश शिवराम महाले (अध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर समाज महा समिती) तसेच अनिल दिगंबर बडगुजर (पोलीस उपअधीक्षक विभाग फैजपूर),वसंत देवराम बडगुजर उद्योजक यावल,प्रा.डॉ.अविनाश योगराज बडगुजर,कैलास लक्ष्मण बडगुजर (उद्योजक संभाजीनगर),प्रा.श्रीराम जानकीराम बडगुजर (अध्यक्ष बडगुजर समाज यावल),दिलीप काशिनाथ बडगुजर (उपाध्यक्ष बडगुजर समाज यावल),अतुल रमेश बडगुजर (सचिव बडगुजर समाज यावल) या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व माता सरस्वती व कुलदेवी चामुंडा माता यांची प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदलाल सोनू बडगुजर यांनी केले.
दरम्यान या गुणगौरव कार्यक्रमात रावेर यावल मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आर्टिफिशल व आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या वरती माहिती दिली व त्यावरती भविष्यामध्ये खूप संधी आहेत याबद्दल सांगितले.समाजाची शैक्षणिक दृष्ट्या खूप प्रगती व्हावी यासाठी समाजाला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांनी बडगुजर समाजासाठी सभागृहासाठी मदत करणार आहे हे सांगितले.अनिल डीगंबर बडगुजर यांनी बडगुजर समाजा चे वाचनालय व अभ्यासिका किंवा ग्रंथालय हे स्थापन करा व यातून समाजाचे प्रशासकीय अधिकारी तयार करा असे आव्हान आपल्या समाजाला केले.प्रा.डॉ.अविनाश योगराज बडगुजर यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच लहान मोठ्या स्पर्धा परीक्षा द्याव्या हे त्यांनी सांगितले.कैलास लक्ष्मण बडगुजर यांनी शून्यातून विश्वास कसे निर्माण करायचे व व्यवसाय प्रशिक्षण याची सांगड कशी घालायची हे सांगितले.विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना पाचशे रुपये रोख सुरेश महाले यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना दिले.याप्रसंगी विद्यार्थ्यांचे गुणगौरव करतांना स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले.बडगुजर समाजाचा हा पहिला कार्यक्रम संपन्न झाला.अध्यक्षीय भाषणा मध्ये सुरेश शिवराम महाले यांनी शिक्षण आणि अशिक्षित या मधील अंतर हे समाजाला पटवून सांगितले की शिक्षणाने माणसाची व समाजाची व त्याची आर्थिक प्रगती जास्त होते त्यामुळे शिक्षण हे महत्त्वाचे आहे हे त्यांनी समाजाला पटवले.कार्यक्रमास उपस्थितांचे आभार श्रीमती लता अविनाश बडगुजर यांनी मानले व सर्व कार्यक्रमासाठी ज्यांनी मदत केली त्यांचे देखील आयोजकांनी आभार म्हणून त्यांचे हातून असेच समाजात कार्य घडत राहो ही अपेक्षा व्यक्त केली.या कार्यक्रमासाठी संपूर्ण क्षत्रिय बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था यातील संचालक मंडळांनी काम करून कार्यक्रम यशस्वी झाला व समाजातील लोकांनी असाच कार्यक्रम भविष्यात व्हावा असा आग्रह केला.