जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
भारतीय जनता पार्टी आणि अमोलभाऊ शिंदे मित्र परिवारातर्फे आयोजित अनमोल दहीहंडी उत्साहात गोविंदा पथकासह खानदेशी कलावंतांचा सहभाग १८ ऑगस्ट सोमवार रोजी सायंकाळी सहा वाजता लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
भारतीय जनता पार्टी आणि अमोलभाऊ शिंदे मित्रपरिवार यांच्या वतीने दरवर्षी गोकुळाष्टमी निमित्ताने अनमोल दहीहंडी महोत्सव साजरा केला जात असतो.दरम्यान दहीहंडी महोत्सवाचे हे ९ वे वर्ष असून आपल्या भडगावकरांची अनमोल दहीहंडी स्पर्धा नव्हे तर परंपरा या संदेशाखाली आयोजित या सोहळ्यात सातत्यांची भव्य दहीहंडी आणि मटकी सजावट हे मुख्य आकर्षण ठरले.यावेळी जिद्दी ग्रुप गोविंद पथकांचा उत्साहात दहीहंडी फोडण्यात आली.या ठिकाणी कलावंत उपस्थितांचे अमोलभाऊ शिंदे यांनी आभार मानून आपले मत व्यक्त केले.या कार्यक्रमाची सुरुवात गायक लेखक प्रशांत देसले यांचे सुमधुर गायनाने झाली.त्यानंतर विरोधी कलाकार दीपक देवराज आणि विलास वाघ यांनी आपल्या विनोदाची प्रेक्षकांना खळखळून हसविले.तर बाबू मोरे यांच्या नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमात अधिक रंगत आणली आणि संध्या अंभोरे यांच्या गाण्यांनी उपस्थिततांना मंत्रमुक्त केले.बालकलाकार अंशुमन मोरे,गायत्री राजपूत आणि मनोरंजनात तर प्रमोद मोरे यांच्या खास साजरी करणालाही मोठा प्रतिसाद यावेळी मिळाला.याशिवाय ग्रुप डान्स आणि मालेगाव ची डान्स महाराष्ट्र विजेती जिया मोरे लावणीच्या गाण्यावर अतिशय सुंदर डान्स करून प्रेक्षकांचे मन जिंकली.लाईट अँड साऊंड वातावरणात अधिक उत्साह भरला.या दहीहंडी उत्सवाला भडगाव तालुक्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून कार्यक्रम अविस्मरणीय बनवला.शहरात एक वेगळाच उत्साह निर्माण करणाऱ्या या यशस्वी करण्यासाठी सोमनाथ पाटील,संपूर्ण अमोल भाऊ शिंदे मित्रपरिवार तसेच उपक्रमाबद्दल आयोजक भारतीय जनता पार्टीचे अमोलभाऊ शिंदे मित्र परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.