गणेशोत्सव तसेच इतर आगामी सण व उत्सवात डी.जे,लाउडस्पीकर व लेझर लाईट वापर करण्यास बंदी !!
श्रीकांत धिवरे,पोलीस अधीक्षक,धुळे यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती !!
धुळे-पोलिस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ ऑगस्ट २५ गुरुवार
जिल्हयात गणेशोत्सव,ईद-ए-मिलाद,नवरात्र तसेच इतर सण मोठया प्रमाणात व उत्साहात साजरे केले जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सदरील उत्सवाच्या वेळी सांस्कृतीक मंडळांकडुन मोठया प्रमाणात विदयुत रोशनाई,डी.जे.,लाऊड स्पिकर यांचा वापर केला जातो व त्याचप्रमाणे सणांचे देखावे सादर करतांना लेझर लाईट व इतर उपकरणांचा वापर केला जातो.दरम्यान डीजे व लाऊड स्पिकरच्या अधिक वापरामुळे ध्वनी प्रदुषण होवुन नागरिकांच्या आरोग्यास त्याचा विपरीत परिणाम होतांना दिसुन येतो.त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रिया,वृध्द तसेच लहान बालके यांना देखील ध्वनी प्रदुषणाचा त्रास सोसावा लागतो.यात ८५ डेसीबल्स पेक्षा आवाज सतत ऐकल्यावर श्रवणशक्ती कमी होते तसेच १०० डी.बी पेक्षा जास्त आवाजात १५ मिनीटांत कर्णपटल व श्रवण पेशींवर हाणी होवुन मानसिक तणाव वाढणे,रक्तदाब वाढणे,हृदयाचे ठोके वाढण्यासारखे त्रास होतात त्याचबरोबर कायमचे बहिरेपण देखील येण्याचा त्रास होऊ शकतो.
दरम्यान मा.उच्च न्यायालय,मुंबई यांनी क्रिमीनल रिट पिटीशन नं.४७२९/२०२१ अन्वये बेकायदेशिररित्या लावन्यात आलेले अनधिकृत लाऊडस्पीकर ईत्यादीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाबाबत कायदयाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहे.यात ध्वनी प्रदुषण कायदयाच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या अंमलबजावणी करीता कोणीही अनाधिकृत लाऊडस्पीकर,डीजे वाजवुन ध्वनी प्रदुषण केल्यास त्यांच्याविरुध्द पोलीस स्टेशनला कायदेशीर तक्रार नोंदविण्यात येईल.ध्वनी प्रदुषण ( विनीयमन व नियंत्रण) नियम २००० चे परिशिष्ट (Rule 3 (1) and Rule 4 (1)) अन्वये मध्ये नमुद केल्याप्रमाणे दिवस म्हणजे सकाळी ६ ते रात्री १० व रात्र म्हणजे रात्री १० ते सकाळी ६ असे समजण्यात यावे.
ध्वनीच्या संदर्भात Ambient Air Quality Standards नुसार डेसीबलच्या मर्यादेबाबतचा क्षेत्र निहाय खालील प्रमाणे असून मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३८ प्रमाणे नोटीस देवुन कायदेशीर कारवाई केली जाईल.सदर आदेशाचे वारंवार उल्लंघन करतांना आढळुन आल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३६ नुसार त्याचप्रमाणे ध्वनी प्रदुषण ( विनीयमन व नियंत्रण) नियम २००० तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत कारवाई करण्यात येईल.कोणीही विनापरवानगी लाऊडस्पीकर वाजवतांना आढळल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदयाअंतर्गत कारवाई करण्यात येईल.डी.जे.चा वापर करण्यावर कायदेशीर बंदी आहे.लेझर लाईटचा वापर करणे बेकायदेशीर असुन लेझरच्या अतिवापरामुळे परिसरातील लोकांचे आरोग्यास धोका निर्माण होवु शकतो तसेच डोळयांना ईजा होवुन कायमस्वरुपी अंधत्व येवु शकते.तरी लेझर लाईटचा वापर करुन मानवी जिवीतास धोका निर्माण झाल्यास भा. न्या.संहिता कलम २७०,२९२,२९३ कलमान्वये गुन्हा दाखल केला जाईल.तरी डी.जे.लाउडस्पीकर व इतर वादय तसेच लेझर लाईट याबाबत नियमांचे उल्लंघण झाल्यास याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे श्रीकांत धिवरे,पोलीस अधीक्षक,धुळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.