जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव-तालुका (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील वाडे येथील श्री.हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचीत चेअरमनपदी उदयसिंग बाबुसिंग परदेशी यांची तर व्हाईस चेअरमनपदी केशरबाई लक्ष्मण माळी यांची सर्वानुमते नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दरम्यान विजय रामलाल परदेशी यांनी ठरल्याप्रमाणे चेअरमन पदाचा तर साहेबराव कौतीक माळी यांनी व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने या दोघ रिक्त जागेसाठी हा निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी नवनिर्वाचीत चेअरमन उदयसिंग परदेशी व व्हाईस चेअरमन केशरबाई माळी यांचा संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन भडगाव सहाय्यक निबंधक महेश कासार यांनी काम पाहीले व त्यांना संस्थेचे सचीव अर्जुन पाटील,प्रेमसिंग राजपुत यांनी सहकार्य केले.यावेळी विजय रामलाल परदेशी,साहेबराव कौतीक माळी,देविदास सहादु माळी,डाॅ.दिवाकर वेडु पाटील,अशोक भुतेसिंग परदेशी,चंद्रशेखर विष्णु चौधरी,भाऊसाहेब नामदेव पाटील,कैलास अभिमन माळी,सुपडु गंगाराम मोरे,संगीताबाई शांताराम पाटील,सुंदरबाई रामदास माळी आदि संचालक तसेच माजी चेअरमन नारायण परदेशी,प्रा.संजय राजपुत,पंडीत रायभान पाटील,अरुण माळी,रविंद्र माळी,बापु पाटील,नाना परदेशी,राजीव परदेशी,दगा परदेशी, कैलास परदेशी,शेतकरी संघाचे संचालक राजेंद्र परदेशी,प्रताप परदेशी बांबरुड प्र.ब.यांचेसह नागरीक उपस्थित होते.चेअरमन उदयसिंग परदेशी यांचा सत्कार माजी जि.प.सदस्य डाॅ.कर्तारसिंग परदेशी,माजी चेअरमन नारायण परदेशी,पञकार अशोक परदेशी,भडगाव शेतकरी सहकारी संघाचे संचालक राजेंद्र परदेशी,माजी चेअरमन नारायण परदेशी,प्रताप परदेशी,परदेशी व राजपुत समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी,सचीव विनोद परदेशी नागद आदिंनी केला.तसेच भडगाव आदर्श कन्या विदयालयाचे संचालक अरुण माळी यांचा सत्कार सुरेश परदेशी यांनी केला.कार्यक्रम यशस्वितेकरिता प्रकाश वाणी,ज्ञानेश्वर माळी,प्रविण अहिरराव,दुलीचंद परदेशी आदि कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.