यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ ऑगस्ट २५ मंगळवार
तालुक्यातील भालोद येथे भारतीय जनता पक्षाच्या पुर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थित पक्षाची संघटनात्मक बैठक उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.आगामी काळात होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक पार्श्वभुमीवर भारतीय जनता पक्षाचे पुर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या व भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ श्रीमती केतकी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बैठक उत्साहाच्या वातावरणात पार पडली.
राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक अर्थात नगर परिषद,महापालीका,पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर संघटन बांधणी व बुथ स्थरावर संघटना बळकट करण्यासंदर्भात व पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित सेवा पंधरावाडा हा कार्यक्रम सुसुत्रबद्ध आणी प्रभावी नियोजन करण्याबाबत पक्षाची महत्वाची बैठक संपन्न झाली.सदर बैठकीत सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जळगाव पुर्व संघचालक स्व.नारायण महाजन यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्यासह रावेर यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांनी यावल व फैजपुर विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संघटना बळकटी संदर्भात मार्गदर्शन केले.या बैठकीला पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे,कृउबाचे संचालक हर्षल पाटील,खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन नरेन्द्र नारखेडे,भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष डॉ नरेन्द्र कोल्हे,उमेश फेगडे,वैधकीय आघाडीचे डॉ कुंदन फेगडे,यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी फैजपुर मंडळ अध्यक्ष उमेश बेंडाळे,माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण सोनवणे आदी पदधिकारी या बैठकीस उपस्थित होते.