Just another WordPress site

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना दलालांच्या हस्तक्षेपावरून संतप्त महिलांचा रास्ता रोको !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२६ ऑगस्ट २५ मंगळवार

तालुक्यात महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाद्वारे राबविण्यात येत असलेल्या नोंदणीकृत कामगारांना मोफत भांडी वाटप योजने अंतर्गत लाभार्थ्यांना भांडी योजनेचा लाभ मिळवुन देण्यासाठी स्वार्थी दलालांचा हस्तक्षेप व मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट वाढला असल्यामुळे बांधकाम मजुरांच्या हितासाठी असलेल्या जनहित योजनेचे पुर्णपणे बारा वाजले आहे.परिणामी सदरील दलालांच्या हस्तक्षेपा विरोधात तसेच गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी संतप्त महिलांच्या वतीने आज दि.२६ ऑगस्ट मंगळवार रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सदरहू तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी ही ऑनलाईन केली जात असल्यामुळे अनेक स्वार्थी दलालांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर वाढला असून सदरील दलालाच्या हस्तक्षेपामुळे मोठा गोंधळ व समस्या निर्माण होत असल्याने ही योजना ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन करण्यात यावी अशी  मागणी आंदोलनकर्त्या महिलांच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी प्रशासनाच्या भोंगळ व गोंधळलेल्या कामकाजाबाबत शेकडो गरजु महिलांनी रस्त्यावर उतरून तीव्र नाराजी व्यक्त केली.यानिमित्ताने यावल शहराच्या रस्त्यावर भुसावळ टी पाँईट वर शेकडो महिलांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले परिणामी सदरील आंदोलनामुळे एक तास वाहतुकीची कोंडी झाली.यावेळी यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी या आंदोलनात सहभाग घेत महिलांचे प्रश्न व व्यथा संबधित विभागाच्या अधिकारी यांच्या निर्देशनात आणुन दिली व बांधकाम कामगार महीलांच्या समस्या मांडल्या.सदर आंदोलनाचे नेतृत्व महिला कार्यकर्ता चंद्रकला इंगळे यांनी केले.या आंदोलनात शेकडो महिलांनी सहभाग घेत महिला बांधकाम कामगार कुटुंबांच्या समस्या व अडचणी मांडल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.