रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ सप्टेंबर २५ शुक्रवार
येथील तहसील कार्यालयातील कर्तव्यदक्ष निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांची मुलगी सुकेष्णी संजय तायडे हीने नुकत्याच झालेल्या राज्य पात्रता सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.सदरहू सुकेष्णी तायडे हिच्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान सुकेष्णी तायडे हिने १५ जून २५ रोजी इंग्रजी विषयात सेटची परिक्षा दिली होती व ही परिक्षा प्रामुख्याने महाविद्यालयीन,विद्यापीठ स्तरावरील प्राध्यापक किंवा असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी घेतली जाते.सदरील परिक्षेत सुकेष्णी तायडे हिला पहिल्या पेपरमध्ये ८४ तर दुसऱ्या पेपरमध्ये १४६ गुण मिळाले असून सुकेष्णीला प्राध्यापक होण्याचे स्वप्न साकार झाले आहे.अत्यंत अथक मेहनतीने चिकाटीने अभ्यास करून सेट परिक्षा उत्तीर्ण झाल्याने सुकेष्णीला व संपूर्ण तायडे परिवाराला मनस्वी आनंद झाला तसेच सुकेष्णीने प्राप्त केलेल्या यशाबद्दल शिक्षक,प्राध्यापक,नातेवाईक व मैत्रिणींनी सुकेष्णीचे अभिनंदन केले आहे.