यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ सप्टेंबर २५ शुक्रवार
येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी व उर्दू विभागाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यावल येथे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी व उर्दू विभागाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एम डी खैरनार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,विद्यार्थ्यांना भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. भाषेद्वारे आपण चांगल्या प्रकारे संप्रेषण करू शकतो.भाषेवर कौशल्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते.भाषेवर जर आपले प्रभुत्व असेल तर आपण चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतो.यावर आधारित उदाहरण सांगितले की अमीन सयामी यांचे रेडिओवर अतिशय उत्कृष्ट असे कार्यक्रम प्रसारित व्हायचे. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि वक्ता म्हणून डॉ.रवींद्र रामदास खरे हिंदी विभाग प्रमुख कला वाणिज्य आणि कम्प्युटर एप्लीकेशन महिला महाविद्यालय डोंगर कठोरा यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे सांगितले की,हिंदी भाषेमध्ये अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे त्यामध्ये मीडिया,पत्रकारिता वेब सिरीज,कल्चरल टुरिझम,स्क्रिप राईटर हिंदी भाषा अधिकारी इत्यादी ठिकाणी तुम्हाला हिंदी भाषेद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात तसेच स्पर्धा परीक्षा एमपीएससी,यूपीएससी सीसॅट यासारख्या स्पर्धात्मक परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांना लागणाऱ्या नोट्स या हिंदी भाषेमध्ये उपलब्ध असल्याचे डॉ रवींद्र खरे यांनी आपले मनोगतात नमूद केले.भारतात हिंदी भाषा बोलणारे ५५ लाख लोक आहेत आणि त्यापेक्षा जास्त हिंदी भाषा ऐकणारे लोक आहेत.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रतिभा रावते यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक इमरान खान यांनी केले.या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एम डी खैरनार,उपप्राचार्य डॉ.एच.जी भंगाळे,माजी उपप्राचार्य ए पी पाटील,हिंदी विभाग प्रमुख डॉ.पी व्ही पावरा,डॉ.आर एस गायकवाड,डॉ.आर डी पवार,प्राध्यापक इमरान खान व सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.