भडगाव ते वाडे मुक्कामी व इतर बस फेऱ्या सुरळीत करण्यात याव्या !! पत्रकार अशोक परदेशी यांचे आगारप्रमुखांना निवेदन !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.०६ सप्टेंबर २५ शनिवार
भडगाव ते वाडे मुक्कामी बस सह इतर बस फेऱ्या सुरळीत व नियमित सुरु ठेवाव्यात.बस फेऱ्या अचानक केव्हाही बंद करण्यात येतात यामुळे प्रवाशी,विदयार्थी व वृद्ध मंडळींचे प्रवासासाठी मोठे हाल होतांना दिसतात तरी भडगाव ते वाडे मुक्कामी बंद असलेली एस टी बस व इतर बस फेऱ्याही सुरळीत व नियमित सुरु कराव्यात अन्यथा प्रवाशी,विदयार्थ्यांसह आंदोलन छेडले जाईल असा ईशारा वजा निवेदन भडगावचे पत्रकार व वाडे येथील रहिवाशी अशोक परदेशी यांनी काल दि.५ रोजी भडगाव बसस्थानकाचे वाहतुक निरीक्षक व पाचोरा आगार प्रमुखांना दिलेले आहे.
भडगाव बसस्थानक वाहतुक निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,भडगाव ते वाडे ही मुक्कामाची बस पोळयाच्या यात्रेनंतर जवळपास १० ते १२ दिवसापासुन अचानक बंद करण्यात आली होती.तक्रारी मांडल्या असता ही मुक्कामे बस दि.४ रोजी पाठविण्यात आलेली होती मात्र ही मुक्कामी बस नियमित सुरु ठेवावी अशी मागणी आहे.तसेच दि.५ रोजी भडगावहुन वाडे येथे सुटणारी सकाळची ८.३० वाजेची बसही अचानक बंद करण्यात आली.शाळेला सुटी असल्याने ही बस बंद केल्याचे एस टी महामंडळाकडुन सांगण्यात आले मात्र भडगाव बसस्थानकावर वाडे मार्गाने जाणारे बरेच प्रवाशी थांबलेले होते.वाडे गावासह इतर गावांचे प्रवाशीही गावांमध्ये बसची वाट पाहत बसलेले होते मात्र अचानक ही बस बंद केल्याने प्रवाशांचे प्रवासासाठी मोठे हाल झाल्याचे दिसुन आले.तसेच वाडे मुक्कामी बस बंदमुळेही प्रवाशांचे मोठे हाल झाले व अचानक बस फेऱ्या बंद केल्यामुळे वाडे,टेकवाडे बुद्रुक,नावरे,बांबरुड प्र.ब,दलवाडे,गोंडगाव,सावदे,घुसर्डी,लोणपिराचे, बोरनार,कनाशी,देव्हारी,बोदर्डे,कोठली,वढधे,भडगाव या सर्व गावांच्या प्रवाशी,विदयार्थी,वृद्ध मंडळी यांचे प्रवासासाठी अतोनात हाल होत आहेत.प्रवाशांना बस सेवे अभावी प्रवासाला मुकावे लागत आहे.दुसरीकडे प्रवाशांचे प्रवासासाठी अतोनात हाल होत आहेत.एस टी महामंडळाचे उत्पन्न बुडत आहे.खाजगी प्रवाशी वाहतुकीला वाव मिळत आहे मग याला जबाबदार कोण ? असा प्रश्न प्रवाशी वर्गातुन उपस्थित होत आहे.सर्व बस फेऱ्या या भडगाव तालुक्यात पाचोरा आगारातुन सोडण्यात येतात मात्र वाडे गावासह इतर गावांच्याही बस फेऱ्या अचानक का बंद करण्यात येतात ? पाचोरा आगाराचा मनमानी कारभार वाढल्याचे दिसत आहे याचीही चौकशी वरीष्ठांमार्फत करण्यात यावी.भडगाव ते वाडे मुक्कामी बस नियमित सुरु ठेवावी व इतरही बस फेऱ्या नियमित व सुरळीत सुरु ठेवाव्यात अन्यथा प्रवाशी,विदयार्थ्यां सह आंदोलन करण्यात येईल याची एस टी महामंडळाने दखल घ्यावी अशी विनंती अर्जाद्धारे करण्यात आलेली आहे या निवेदनावर पत्रकार अशोक परदेशी यांची सही आहे.निवेदन देतांना बसस्थानकातील वाहतुक निरीक्षकासह इतर कर्मचार्यांकडे वेळोवेळी अचानक बस फेऱ्या का बंद करण्यात येतात यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत तरी वाडे मुक्कामी बस सह इतर बस फेऱ्या सुरळीत व नियमीत सुरु ठेवाव्यात अशी मागणी मांडुन सविस्तर चर्चा करण्यात आली.