यावल शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यातबाबत नितिन सोनार यांची नगर परिषद प्रशासनाकडे मागणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०६ सप्टेंबर २५ शनिवार
शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असुन त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असुन नागरीकांना या कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला आहे तरी यावल नगरपरिषदने या मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा वेळीच तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्हा पुर्व विभागाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी नगर परिषदच्या आरोग्य विभागाकडे केली नुकतीच केली आहे.
दरम्यान शहरातील नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख रस्ते व विस्तारित वसाहतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासुन मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी आपला उपद्रव वाढवला असुन दुचाकी वाहनधारकांच्या अंगावर तसेच शाळकरी बाळांच्या धावुन येणे हा प्रकार रोजचा झाला असुन विस्तारित क्षेत्रातील अनेक लोकांच्या पाळीव शेळ्या देखील मारल्या गेल्या आहे.सदरहू शहरात या मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांकडून काही मोठी अप्रिय घटना होवु नये याची काळजी घेणे नगर परिषद प्रशासनाच्या आरोग्य विभागाचे कर्तव्य असल्याची जाणीव करून देत मोकाट कुत्र्यांचा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा पुर्व विभागाचे उपसंघटक नितिन सोनार यांनी यावल नगर परिषदच्या आरोग्य विभागाचे प्रभारी अधिकारी शेळके यांच्याशी भेट घेत उपरोक्त विषयावर मागणीद्वारे केली आहे.