यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ सप्टेंबर २५ रविवार
येथील शहरातुन एक सहा वर्षाचा मुलगा अचानक बेपत्ता झालेल्या बालकाचे प्रेत जळालेल्या व मृत अवस्थेत मिळाल्याने पालक वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले असुन सदरच्या बाळाचा र्निघृणपणे खून करीत त्याचे प्रेत जाळण्यात आल्याची घटना घडली असून पोलीसांनी घटनेची दखल घेत एका संशयीतास अटक केली आहे. बेपत्ता झालेल्या बालकाच्या पालकांनी यावल पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची खबर दिली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की,यावल शहरात दि.५ सप्टेंबर रोजी शहरातील मजीद खान जनाब राहणार बाबूजीपुरा यावल यांचा सहा ते सात वर्षाच्या हनान खान नावाचा बाळ बेपत्ता झाला होता.दरम्यान हनान खान नावाचा सहा ते सात वर्षाचा बाळ हा अचानक बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्याने बाळाच्या कुटूंबीयांनी व नातेवाईकांनी सर्वत्र त्याचा शोधुन देखील तो मिळून आला नाही.दरम्यान रात्रीच्या वेळी सदर बाळ हरवल्याची खबर पोलीसात देण्यात आली होती,मात्र काल त्या बेपत्ता झालेल्या बाळाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत शेजारी राहणाऱ्यां व बंद असलेल्या घरातील वरच्या खोलीत मिळाल्याने यावल शहर व परिसरातील पालकवर्गा मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.यावल शहरात व परिसरात त्या बाळाचा खुन करण्यात आल्याची चर्चा होत असल्याने पोलीसांनी दक्षता घेत तात्काळ त्या घरमालकाला चौकशी कामी ताब्यात घेतले व त्यांनी सदर बाळाचा खून करण्यात आल्याची माहिती पोलीसांना दिली.मयताचे आजोबा यासीन खान नथ्थे रवान वय ७४ वर्ष यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने संशयीत आरोपी शेख शाहीद शेख बिसमिल्ला वय २२ वर्ष याच्या विरुद्ध बि एन एस कलम १३७ (२) १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक मसलोद्दीन शेख व पोलीस करीत आहे.दरम्यान त्या जळालेल्या बाळाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले व काल रात्रीच्या सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात खुन झालेल्या बाळाचा शेकडो लोकांच्या उपस्थित दफनविधी करण्यात आले.