Just another WordPress site

यावल तालुका मराठा सेवा संघाची वार्षिक आढावा सभा उत्साहात संपन्न !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०७ सप्टेंबर २५ रविवार

येथील तालुका मराठा सेवा संघाची वार्षिक आढावा सभा आज दि.७ सप्टेंबर रविवार रोजी येथील खरेदी विक्री संघ कार्यालयात आयोजित करण्यात आली.सदर बैठक मराठा सेवा संघटना राज्य उपाध्यक्ष शिवश्री सुरेंद्र पाटील,नाशिक विभागीय अध्यक्ष रामदादा पवार,विभागीय उपाध्यक्ष सुमित पाटील,जळगाव जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ.अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाने मराठा सेवा संघाच्या कार्यकाळाचा आढावा घेऊन नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली.

दरम्यान तालुका अध्यक्ष म्हणून अजय पाटील तर सचिव अतुल यादव यांना कायम ठेवून मराठा सेवा संघ व उद्योग कक्ष नवीन पदाधिकारी पदी कार्याध्यक्ष दीपक चव्हाण,उपाध्यक्ष अमोल खैरनार यांची निवड जाहीर करून तालुका कार्यकारणीकडे पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली.याप्रसंगी राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून धनराज पाटील तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून श्रीकांत मोटे व संदीप पाटील नायगाव संयुक्त उपाध्यक्ष,जिल्हा संघटक म्हणून बी.डी.पाटील या सर्वांना नियुक्त पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.याप्रसंगी यावल तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अतुल पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन बहुमोल मार्गदर्शन केले तसेच संचालक तेजस पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.प्रसंगी नायगाव माजी सरपंच व्ही.एल.पाटील,आर इ पाटील,देवकांत पाटील,सुनील गावडे,बापू जासूद,प्रमोद पाटील,योगेश पाटील किनगाव,भैय्या पाटील उंटावद,समाधान पाटील दहिगाव,विनोद पाटील चुंचाळे,कृष्णा पाटील दहिगाव,उद्योग कक्षाचे स्वप्निल बोरसे,एम.पी.चव्हाण, जिजाबराव पाटील सावखेडा,रवींद्र टोंगळे यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक उद्योग क्षेत्रातील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.सभेचे प्रस्ताविक अजय पाटील यांनी तर सूत्रसंचालन अतुल यादव यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.