Just another WordPress site

भडगाव येथील प्रशांत जोशी यांना लोहपुरुष सरदार पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान !!

जावेद शेख,पोलीस नायक

भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-

दि.०८ सप्टेंबर २५ सोमवार

सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल २०२५ या वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्यासह विष्णूभाऊ भंगाळे माजी महापौर जळगाव,सरला माळी जिल्हाप्रमुख महिला जळगाव,जिल्हा डायटचे प्राचार्य झोपे सर,डायटचे सी.डी.साळुंखे,ग.स.सोसायटी अध्यक्ष अजबसिंग पाटील अशा विविध अधिकारी व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते प्रशांत जोशी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.पाचोरा तालुक्यातील एकमेव प्रशांत जोशी सरांना सदरील पुरस्कार प्रदान करण्यात आला हे विशेष !.

प्रशांत रमेश जोशी हे जिल्हा परिषद केंद्र शाळा कुरंगी ता.पाचोरा या शाळेत उपशिक्षक पदावर कार्यरत असून त्यांनी वर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सतत घवघवीत यश संपादन करत आलेले आहेत.दरम्यान प्रशांत जोशी यांनी शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात केलेल्या प्रशंसनीय कार्याच्या सन्मानार्थ लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.याबद्दल त्यांचे केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,सर्व शिक्षक,पालक,गावकरी,विविध संस्थांचे संघटनांचे पदाधिकारी,सहकारी शिक्षक मित्रमंडळी यांनी त्यांचे अभिनंदन करत यापुढेही असेच त्यांच्या हातून शैक्षणिक,सामाजिक कार्य होत राहो यासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.प्रसंगी ‘पोलीस नायक’वृत्तपत्राशी बोलताना ते म्हणाले की,हा सन्मान माझ्या कार्याचा गौरव करणारा असला तरी तळागाळात प्रामाणिकपणे विद्यार्थी हीच जोपासणाऱ्या माझ्यासारख्या सर्व शिक्षकांच्या कार्याला समर्पित हा पुरस्कार आहे.आता या पुरस्कारामुळे माझ्यावरील जबाबदारी ही वाढली असून पुढील काळात आणखीनच अधिक जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.