यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दत्त महाराजांचे जागृत देवस्थान श्रीपंत मंदिर आनंदवन श्रीक्षेत्र डोंगरदा येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही दिनांक २६ ऑक्टोबर २२ बुधवार रोजी सकाळी ८ वाजता गोवर्धन पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे.प्रसंगी सातपुड्याच्या पायथ्याशी जाऊन षोडशोपचार पूजन करण्यात येणार आहे.सदरील पूजा विधी करण्यासाठी ११ जोडपे सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाला स्वामी शास्त्री सरजूदासजी मधुसूदन महाराज,महामंडलेश्वर जनार्दन हरी स्वामी महाराज सतपंथ मंदिर फैजपुर,स्वरूपानंद महाराज श्रीक्षेत्र डोंगरदे,आ.शिरीषदादा चौधरी,शेखर पाटील,डॉ.कुंदन फेगडे,भरत महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.तसेच सरपंच नवाज तडवी,पोलीस पाटील राजरत्न आढाळे,उपसरपंच धनराज पाटील,ग्रा.पं.सदस्य डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,मनोहर महाजन,दिलीप तायडे,जुम्मा तडवी,आशा आढाळे,कल्पना राणे,ऐश्वर्या कोलते,शबनम तडवी,कल्पना पाटील,हेमलता जावळे,शकीला तडवी,नितीन भिरूड,राहुल आढाळे,रबील तडवी,चंदू भिरूड,यांच्यासह डोंगरदा व डोंगर कठोरा येथील गावकरी यांची देखील उपस्थिती लाभणार आहे.याप्रसंगी दुपारी १० ते १२ या कालावधीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन पंत मंदिर आनंदवन श्रीक्षेत्र डोंगरदा व डोंगर कठोरा ग्रामस्थ तसेच गोवर्धन पुजा समन्वय पदाधिकारी यांनी केले आहे.