वनोली येथील भक्तनिवासाचे काम एकवर्षांपासून अपूर्ण अवस्थेत !! ठेकेदार व अधिकारी मिळत नसल्याने विश्वतांमध्ये नाराजी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० सप्टेंबर २५ बुधवार
तालुक्यातील पंचक्रोशीतील भाविक नागरीकांचे श्रद्धास्थान असलेल्या वनोली श्री क्षेत्र साईबाबा देवस्थान मंदिरासाठी ट्रस्टचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश सदस्य हिरालाल भाऊ चौधरी यांच्या प्रयत्नाने मागील वर्षी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने भक्तनिवास मंजूर करण्यात आले होते.या कामास दीड वर्षा झाले असले तरी सदरचे काम ठोकेदाराने अपूर्ण ठेवले असून येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये वनोली साईबाबा मंदिरासाठी भक्तनिवास वापरण्यासाठी उपलब्ध होईल का ? व त्याचे काम पूर्णत्व कडे जाईल का ?असे प्रश्न ग्रामस्थामध्ये उपस्थित करण्यात येत आहे.नवरात्र उत्सवाच्या आधी काम पूर्ण न झाल्यास या कामाची चौकशी लावावी लागेल असा स्पष्ट इशारा या ट्रस्टीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल व्यंकट चौधरी यांनी दिला आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेमार्फत श्री साईबाबा देवस्थान वनोली तालुका यावल येथे २५ लक्ष रुपये किमतीचे भक्तनिवास हिरालाल भाऊ चौधरी यांच्या पाठपुराव्यामुळे व नामदार गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आला होता मात्र तत्कालीन आमदार माजी आमदार शिरीषदादा चौधरी होते त्यावेळी त्यांचे पत्र जोडून सदरचे काम एका मजुर सोसायटीला देण्यात आले.काम कुणालाही मिळो मात्र ते चांगले व्हायला हवे आणि वेळेत व्हायला हवी अशी प्रत्येक गावाची भावना असते व दीड वर्षे उलटून गेले तरी संबंधित ठेकेदाराने आतापर्यंत या भक्तनिवासाची काम पूर्ण केलेले नाही यावरील अधिकारी व ठेकेदार हे फोन उचलत नाही असाही आरोप होत आहे.नवरात्रीमध्ये घटस्थापनेपासून तर अष्टमी पावितोवनोली श्री साईबाबा मंदिराचा यात्रोत्सव असतो व अष्टमीच्या दिवशी चाळीस ते पन्नास हजार भाविक या ठिकाणी महाप्रसादासाठी हजेरी लावतात.पावसाळ्याचे शेवटच्या चरणात सदरच्या यात्रा महोत्सव येतो मुंबई गुजरात सुरत पुणे मध्य प्रदेशया ठिकाणाहून भाविक येतात.गाव लहान असल्यामुळे रहिवासाची अडचण येते व कमीत कमी येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी निवारा म्हणून सदरचा भक्तनिवास वापरता येऊ शकेल.या यात्रा उत्सवाच्या आधी भक्तनिवासाचे काम उर्वरित राहिलेले पूर्ण करावे अन्यथा याची रितसर चौकशी लावावी लागेल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.गच्चीचे फिनिशिंग बाकी आहे फरशी बसवलेली नाही भक्तनिवास कसा असावा ? ज्या खिडक्या आणि दरवाजे बसवल्या आहेत ते ढोर कोठ्या सारखी काम झाले आहे.तसेच समोर व आजूबाजूला पिवर ब्लॉक बसवले नाही.सदरच्या ठेकेदाराची बिल अदा करण्यात आले किंवा काय ? हे सुद्धा माहित नाही हा बांधलेला भक्त निवास इस्टिमेट नुसार दिसत नाही वेळोवेळी संपर्क साधला मात्र ठेकेदार फोन उचलत नाही सदरच्या भक्तनिवासाची काम पूर्ण झाल्याशिवाय या ठेकेदाराचेपैसे मंजूर करण्यात येऊ नये असा आरोप वनोलीकरांनी केला असून हे काम त्वरित पूर्ण करावी अशी मागणी आहे.