नागदचे विनोदसिंग परदेशी यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान !! सर्वस्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१२ सप्टेंबर २५ शुक्रवार
शिवराणा संघ व नागरी विकास सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी नागद ता. कन्नड येथील पदवीधर शिक्षक विनोदसिंग गोपालसिंग परदेशी यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.विनोदसिंग परदेशी हे किन्ही ता.सोयगाव येथे कार्यरत असून सध्या ते चाळीसगाव येथे वास्तव्यास आहेत.सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षक तथा सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा मानाचा पुरस्कार दिला जातो.हा पुरस्कार विनोदसिंग परदेशी यांना ज्येष्ठ विधीतज्ञ आनंदसिंग बायस,लोकमतचे जेष्ठ पत्रकार खंडाळकर,महाराष्ट्र प्रदेश करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.जीवनसिंग राजपुत,संस्थेचे अध्यक्ष एल.डी.ताटु,सुभाष कोकुल्डे,अंजली कोकुल्डे,भरतसिंह घुनावत या मान्यवराच्या शुभहस्ते देण्यात आला.याप्रसंगी अनेक मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान विनोदसिंग परदेशी यांचे सामाजीक क्षेञासह शैक्षणिक व कला,सांस्कृतीक क्षेञातही उल्लेखनीय कामगीरी आहे.उत्कृष्ट वकृत्व त्यांचे अंगी असुन ते साईराज आॅर्केस्टाृचे मालक आहेत. आज हिंदी,मराठी गाण्यांच्या स्वमधुर ताला सुरात संगीताच्या तालावर रंगीन दुनियेत प्रत्येक माणसाच्या मनात त्यांचे कलाकरीचे अन त्यांच्या प्रभावशालीचे ते घर करुन बसलेले आहेत.अशा संगीतमय दुनियेत असो वा शैक्षणिक,सामाजीक क्षेञात त्यांनी आपल्या कार्याची जणु छबीच निर्माण केलेली आहे.संगीत क्षेञातले बादशाह अन रशिकांचे चाहते विनोदसिंग परदेशी सर हे जळगांव जिल्ह्याच्या परदेशी,राजपुत समाजाचे जिल्हा सचिव पदावरही चांगले कार्य करीत आहेत.विविध क्षेञासह शैक्षणिक क्षेञातही विनोदसिंग परदेशी सरांनी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवुन एक नवा आदर्श निर्माण केला आहे.सदरहू आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विनोदसिंग परदेशी यांच्या निवडीबद्दल त्यांचे नागद येथील समाजातील नागरीक,महिला,मिञ परीवार तसेच किन्ही शाळेचा संपुर्ण शिक्षक स्टाॅफ, कन्नडचे माजी आमदार उदयसिंग राजपुत,शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय परदेशी,परदेशी राजपुत समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी,तंटामुक्ती जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी बांबरुड प्र.ब, उपाध्यक्ष भगवान बेडवाल,चाळीसगाव तालुकाध्यक्ष भगवानभाऊ महेर,भडगाव तालुकाध्यक्ष अशोकबाप्पु परदेशी,पाचोरा तालुकाध्यक्ष इंदलसिंग परदेशी,जामनेर तालुकाध्यक्ष अमोल काहीटे,कन्नड तालुका अध्यक्ष प्रकाश चांदा,सोयगाव तालुका अध्यक्ष दिलीप मचे यांचेसह परदेशी,राजपुत समाजाचे सर्व पदाधिकारी तसेच चाळीसगाव परदेशी,राजपुत समाज उन्तती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.कर्तारसिंग बापु परदेशी,अध्यक्ष भरतसिंग छानवाल व सर्व संचालक मंडळ या सर्वांमार्फत विनोदसिंग परदेशी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.