Just another WordPress site

रवी राणा व बच्चू कडू यांचे मनोमिलन करण्याकरिता शिंदे-फडणवीस मध्यस्थी करणार?

दिलीप गणोरकर

अमरावती विभाग प्रमुख:-

राज्यातील सत्ताधारी पक्षांचे समर्थन करणाऱ्या दोन आमदारांमध्ये सध्या जोरदार खडाजंगी सुरू आहे.प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी राजकीय उलथापालथीवेळी शिवसेनेतून बंड केलेल्या एकनाथ शिंदे यांची साथ दिली मात्र नंतर बच्चू कडू यांचा भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांच्याशी राजकीय संघर्ष सुरू झाला यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्परांवर घणाघाती आरोप केले मात्र या राजकीय वादावर लवकरच पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कारण हा वाद मिटवण्यासाठी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन नेते मध्यस्थी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील राजकीय संघर्ष कमी व्हावा यासाठी शिंदे-फडणवीसांकडून या दोन्ही नेत्यांची दिवाळीनंतर एकत्रित बैठक घेतली जाणार आहे.या बैठकीत कडू आणि राणा यांना समज दिली जाईल आणि एकमेकांवर आगामी काळात आरोप न करण्याविषयीच्या सूचना दिल्या जातील असे समजते.राज्यात सत्तांतर होत असताना बंड करत गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडू यांनी ५० खोके घेतले,असा आरोप आमदार रवी राणा यांच्याकडून करण्यात आला आहे.महाविकास आघाडीचे नेते जी भाषा वापरतात त्याच भाषेत भाजप समर्थक अपक्ष आमदाराने आरोप केल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरत आहे.रवी राणा यांच्या या भूमिकेमुळे विरोधकांच्या आरोपांना बळ मिळत असल्याचे सांगत शिंदे गटातील आमदारांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे.याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू-राणा हा वाद लवकरात लवकर मिटावा अशी अपेक्षा सत्ताधारी गोटातून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान,रवी राणा यांनी माझी बदनामी केली.आमची २०-२० वर्ष राजकीय करिअर उभे करायला गेली.मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर दिले पाहिजे या संदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील नोटीस पाठवणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले होते.त्यानंतर आता शिंदे-फडणवीसांनी मध्यस्थीची तयारी दाखवल्याचे सांगितले जात असल्याने आगामी काळात खरेच विदर्भातील या दोन नेत्यांचे मनोमिलन होणार की नाही?हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.