Just another WordPress site

यावल येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने समाज संपर्क मेळावा संपन्न !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१४ सप्टेंबर २५ रविवार

आगामी काळात होवु घातलेल्या नगर परिषद सार्वत्रीक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे शिवसेना शिंदे गटाचा संपर्क मेळावा जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकारी व बारी समाज बांधवांच्या उपस्थित नुकताच संपन्न झाला.

दरम्यान शहरातील बारीवाडा परीसरात समाजाच्या वतीने शिवसेनेच्या शिंदे गटाचे यावल शहर प्रमुख पंकज बारी यांच्या प्रत्यनांनी आयोजित करण्यात आलेल्या या समाज संपर्क मेळाव्यात पंकज बारी यांना संपूर्ण बारी समाजाचा उत्कृष्टपणे पाठिंबा मिळून संपूर्ण बारी समाजाची उपस्थिती या कार्यक्रमात लाभली.यावेळी पंकज बारी यांच्या जनहिताच्या कार्याला समाजातील सर्व तरुण कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असल्याचे दिसुन आले.यावेळी त्यांच्या केलेल्या समाजकारणातील कामांची स्तुती उपस्थित मान्यवरांनी केली.या कार्यक्रमास जिल्हाप्रमुख समाधान महाजन,माजी जिल्हा प्रमुख विलास मुळे,उपजिल्हा संघटक नितीन सोनार,तालुका प्रमुख राजू काठोके,तालुका समन्वयक सुभाष चौधरी,फैजपूर शहर प्रमुख पिंटू मडवाले,यावल उपशहर प्रमुख राजू सपकाळे आदी शिवसेना शिंदे गटाचे पदधिकारी व कार्यकर्ते तसेच बारी समाजातील भाजपाचे कार्यकर्ते पुंडलीक बारी,भाजपा यावल शहर अध्यक्ष राहूल बारी,समाजातील प्रगतीशील शेतकरी अशोक बारी यांच्यासह विलास बारी,राजु काळे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.