Just another WordPress site

मोटरसायकलवर लिप्ट देणाऱ्याच्या अल्पवयीन पुतणीची दुचाकीवर छेड काढल्याप्रकरणी एकाविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१४ सप्टेंबर २५ रविवार

माणुसकी म्हणुन मोटरसायकलवर बसुन आपल्या ओळखीच्या माणसाला आपल्या गावात आणले असता सदरच्या लिफ्ट देवुन तरुणाची मदत करणाऱ्या व्यक्तिच्या अल्पवयीन पुतणीची लिफ्ट घेणाऱ्याने छेड केल्याची लाजीरवाणी घटनासमोर आली असुन यावल पोलीस ठाण्यात त्या तरुणाविरुध्द पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,यावल तालुक्यातील एका गावात काल दि.१३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आपल्या गावापासुन जवळ असलेल्या गावात फिर्यादी असलेला लहान भाऊ हा आपला मोठा भाऊ काही कामा निमित्ताने जळगाव गेले असता फिर्यादीच्या मोठया भावाच्या ११ वर्ष व ९ वर्ष या दोघ मुलींना घेवुन जेवणासाठी गेले असता आपले काम आटोपुन परत आपल्या गावाकडे येण्यासाठी निघत असतांना एका दुकानांवर आपल्याच गावातील ओळखीचा नंदराज मोरे नामक व्यक्ति मिळाला व मलाही आपल्या बरोबर येवू द्या असे म्हणाला.सदरचा तरुण हा गावातील व ओळखीचा असल्याने फिर्यादीच्या भाऊने त्या तरुणास लिफ्ट दिली असता मोटरसायकल आपल्या काकाबरोबर मागे बसलेल्या ९ वर्षाच्या मुलीच्या मागे संशयीत आरोपी मोरे हा बसला व त्यांने त्या अल्पवयीन मुली लज्जा वाटेल अशी छेड काढली.सदरचा त्या तरूणाने केलेला सर्व प्रकार त्या अल्पवयीन मुलीने आपल्या आईला सांगीतल्याने वरील घडलेले प्रकार समोर आला.याबाबत मुलीचे काका यांनी यावल पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी नंदराज मोरे याच्या विरूध्द फिर्याद दाखल केल्याने आरोपीवर पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येवुन त्यास अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.