यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ सप्टेंबर २५ सोमवार
देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या जन्मदिना निमित्ताने २ ऑक्टोबर या महात्मा गांधी यांची जयंती या कालावधीत देशभरात साजरा होणारा सेवा पंधरवाडा कार्यक्रमाच्या निमित्ताने यावल येथे आमदार अमोल जावळे यांच्या उपास्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कार्यशाळा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
येथील तालुका खरेदी विक्री शेतकरी सहकारी संघाच्या सभागृहात रावेर यावल तालुक्याचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थित देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजी साजरे होणाऱ्या जन्मदिन पासुन तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोबर साजरी होणारी जयंती निमित्ताने या कालावधीत नागरिकांच्या जनहिताचे उपक्रम राबविण्यासाठी सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे.या उपक्रमात रक्तदान शिबिरे आयोजीत करणे,स्वच्छता मोहीमा राबविणे,नमो युवा रन मॅरेथोन स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,सामाजिक मदतकार्य तसेच आत्मनिर्भर भारताच्या दिशेने जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहे.भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित संपन्न झालेल्या या सेवा पंधरवाडा आयोजन मार्गदर्शन कार्यशाळेत आमदार अमोल जावळे यांनी मार्गदर्शन करतांना देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी सेवा आणी स्वच्छता या मुल्यांवर आधारीत अपक्रमांचे नियोजन व अमलबजावणी सविस्तर मार्गदर्शन केले.या मार्गदर्शन कार्यशाळा कार्यक्रमास भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी पाटील,यावल तालुक्यातील मंडळ अध्यक्ष सागर कोळी,उमेश बेंडाळे,अनिल पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे,भाजपा जळगाव जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन,माजी जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती रविन्द्र उर्फ छोटू पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव,भाजपा माजी तालुकाध्यक्ष उमेश फेगडे,नितिन राणे,भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ कुंदन फेगडे,पुरुजीत चौधरी,गणेश नेहते,भाजपा तालुका सरचिटणीस विलास चौधरी,बाळू फेगडे,भुषण फेगडे यांच्यासह तालुक्यातील पक्षाचे विविध पदाधिकारी मोठया संख्येत उपस्थित होते.